बेकायदेशीर उत्तखनन करणाऱ्या नासीर खानवरही गुन्हा

प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानंतर मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांची कारवाई

युवाशक्ती फाउंडेशन व मनसे वसई उपतालुका अध्यक्ष संजय किणी यांच्या पाठपुराव्यास यश 

वसई(प्रतिनिधी)-वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात मोडणाऱ्या शिरसाड परिसरात  सर्व नियम धाब्यावर बसवून चक्क ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये एका खदाणी मध्ये बेकायदेशीर पणे क्रेशर मशीन द्वारा गौण खनिज उत्तखनन सुरु असल्याची बाब काही महिन्यांपूर्वी  तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.परंतु कारवाई होत नसल्याने याबाबत युवाशक्ती फाउंडेशन तसेच मनसेचे उपतालुका अध्यक्ष संजय किणी यांनीही संबंधित विभागाकडे तक्रार केली होती.शिवाय अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात बेकायदा खाणी सुरू असल्याचे वृत्तही अनेक स्थानिक वृत्त पत्रांमध्ये प्रकाशित झाले होते.दरम्यान प्रांताधिकारी यांनी या वृत्ताची व संजय किणी तसेच युवाशक्ती फाउंडेशनच्या तक्रारीची दाखल घेत सदर खदाण सील करून नासिर खानवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वसई तहसीलदारांना दिले होते.त्या अनुषंगाने तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांना खदान सील करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार बुधवारी सुशांत ठाकरे यांनी त्या खदानीवर कारवाई करून नासीर खानवर गुन्हा दाखल केला आहे.तहसीलर सुरवसे यांनी सदर खदाणीवर
कारवाईचे निर्देश देताच मंडळ अधिकारी
सुशांत ठाकरे,शिरसाड सजाचे तलाठी विजयकुमार मिड,कोतवाल रुपेश साळवी यांनी मांडवी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदत मिळवून घेतली. व त्यानंतर पोलीस नाईक मोरे, राऊत व पंच यांनी सदर जागेवर जाऊन खात्री केली असता दोन टॅक्टर कॉम्प्रेसर उत्तखनन करताना आढळुन आले.त्यावेळी त्यांच्याकडे परवानगी बाबत विचारपूस केली असता त्यांच्या जवळ कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने नासीर खान व टॅक्टर कॉम्प्रेसरचे चालक,मालक यांचे विरुद्ध भा. द. वि.स कलम ३७९,३४ पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम १५,१९ तसेच जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७),(८)प्रमाणे मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे शिरसाड, ता. वसई, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वे नंबर ३६, क्षेत्र १०-००-०० या जागेमध्ये नाशिर नाजीर खान व इतर दोन भागीदार खदाण माफिया यांनी अनधिकृत दगड उत्खनन, बेकायदेशीर जिलेटीन व स्फोटके यांचा वापर करून भूसुरुंग स्फोट करून बेकायदा उत्खनन केलेले दगड, त्याच ठिकाणी असलेल्या क्रशर मशीनमध्ये दगड पावडर व खडी बनविण्याचे बेकायदेशीर काम दिवस-रात्र सुरू होते.त्यामुळे अनधिकृत खदाण व क्रशर मशीन  सुरू असल्याबाबतचे  लेखी निवेदन देऊन संजय किणी यांनी महसूल प्रशासनासमोर अनेक प्रश्‍न उपस्थित करत प्रांताधिकारी, तहसीलदार सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई उपतालुका अध्यक्ष संजय किणी यांनी केला होता.तसेच या प्रकाराबाबत युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पाठपुरावा सुरू होता.अखेर पाठपुराव्या यश प्राप्त झाले आहे.गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी येथील दगड खाणीतील भूसुरुंग स्फोटामुळे बसणार्‍या हादर्‍यामुळे व क्रशर मशीनच्या वायू प्रदूषणामुळे ग्रामस्थांनी जोरदार विरोध करून शासन दरबारी सदर खदाण व क्रशर मशीनबाबत योग्य पाठपुरावा करून कायमस्वरूपी खदाण व क्रशर मशीन बंद करण्याबाबत शासनाकडून लेखी आश्‍वासन दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून खदाण व क्रशर मशीन बंद करून हटविण्यात आली होती; परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नव्याने क्रशर मशीन सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्याला कोणत्या आधारे परवानगी दिली आहे?असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात होता.

 

 

नासीर खानने तहसीलदारांच्या नोटीसीला दाखवली होती केराची टोपली –

या खदानी मध्ये क्रेसर मशीन द्वारा गौण खनिजचे उत्तखनन सुरू असल्या बाबत  येथील काही जागरूक नागरीकांनी अनेकवेळा तक्रार केल्यानंतर दी. १३ नोव्हेंबर रोजी शिरसाड तलाठी यांनी सदर जागेवर पाहणी केली होती.यावेळी ५८ ब्रास उत्तखनन केल्याचे दिसून आले.दरम्यान बेकायदेशीर गौण खनिज उत्तखनन केल्याबद्दल नासिर यास तहसीलदारने दी.२८ नोव्हेंबर रोजी दी ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात हजर राहून परवानगी बाबत कागदपत्रे व आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते. परंतु नासिर याने नोटीशीलाही केराची टोपली दाखवली आहे.उलटपक्षी नासिर खान याने  सदर  क्रेशर मशीन द्वारे  बिनदिक्कत गौण खनिज उत्तखनन सुरू ठेवले होते.
त्यामुळे या खदानीला तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *