

” ईडी नोटीस की आगपेटी “
ईडी नावाची आगपेटी आली
पक्ष सृष्टीलाच पेटवुन गेली
हर हरच्या प्रवाहाला नकार देता
चौकशीच्या पसाऱ्यात अडकता
२२० पार चा आला बघा नारा
ईडी नोटीसांनी विरोधी मारा
उन्मेषची आठ तासांची चौकशी
काॅंग्रेस अध्यक्षपद सोनिया पाशी
वाडरा ,पी चिदंबरम आता राज ठाकरे
राजकीय सुडबुध्दीचेच वाहतेय वारे
विरोधकपण ठाकरेंच्या बाजुने दिसले
निवडणुक पुर्वीचे पडसाद उमटु लागले
ईडी नोटीस आहे की राजकीय आगपेटी
हे अस झाल माझाच दांडु माझीच विटी