
वसई: भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी दिल्ली येथे ‘मोदी सरकार’मधील नवनियुक्त केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उत्तम कुमार यांनी नारायण राणे यांना वसईच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देत, वसईत होणाऱ्या बेकायदेशीर भरणी, बेकायदेशीर बांधकामे, नवनव्या कॉम्प्लेक्स ‘विकास’च्या नावाखाली फक्त आणि फक्त वाढत चाललेली बेकायदा बांधकामे यामुळे दरवर्षी वसईला पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. थोड्या पावसातही वसईत अनेक भागात वसईत पाणी साचते. वसईत मोठी औद्योगिक वसाहत असून तेथील रस्त्यांची भिकट अवस्था असून औद्योगिक गाळ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी शिरून नुकसान होत आहे. यात भर म्हणून वसईत मधूबन परिसरात मोठ्याप्रमाणात असलेल्या पाणथळ जागेवर 15 ते 20 फुटांपर्यंत भरणी करून बांधकामे केली जात आहेत. भविष्यात हे वाढत राहिले तर वसईत नागरिकांच्या 20 ते 25 फुटांपर्यंत पाणी जाणार! ही भयानक परिस्थिती डोळ्यांना पाहवत नाही. अशी माहिती दिली. यावेळी 20 ते 25 मिनिटे सखोल वसईच्या विषयावर चर्चा झाली व निवेदन सुपूर्त केले.