

प्रतिनिधी (हर्षद गिरधोले) : मी या क्षेत्रात आलो ते योगायोगाने.
मला वयाच्या १८ वर्षापर्यंत (म्हणजे१२वी पर्यंत) कलाक्षेत्र माहिती नव्हते.
पण त्याकाळी म्हणजे २०००-२००१ च्या सुमारास जॉनी रावत यांची एक सीडी आगरी रामायण मार्केट मध्ये आली होती. त्या cd मधले आगरी डायलॉग मी फुल्ल पाठ करून टाकले होते. पण पाहिजे तसा रंगमंच त्यावेळी मला मिळत नव्हता. या क्षेत्रात मी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून पदार्पण केले. माझी लहान बहीण प्रीती ती आमच्या घरातली सगळ्यात पहिली कलाकार ती ज्या ज्या ठिकाणी डान्स कॉम्पटीशन ला जायची तिथे मी जजिंग च्या वेळेमध्ये माझी मिमिक्री सादर करू लागलो. त्यातच एका डांस कॉम्पिटिशन मध्ये महेश सावंत सर यांच्याशी माझी ओळख झाली. जे ह्या क्षेत्रातले माझे गुरू आणि ह्या क्षेत्रात माझ्यात व्यावसायिकता आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांच्याच एका मराठी नाटकात त्यांना मिमिक्री करणारा कलाकार हवा होता.
नाटकाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मला दोन मोलाचे उपदेश दिले
पहिला म्हणजे की आधी घर चालवण्यासाठी कुठेतरी नोकरी कर आणि मग ह्या क्षेत्रात उतर आणि दुसरा उपदेश म्हणजे आपले क्षेत्र हे सापशिडी सारखे असते येथे शिड्या देणारे कमी आणि गिळणारे सापच जास्त असतात. त्यामुळे कुठेही कोणत्याही आमिषाला बळी न पडता कुठेच पैसे भरायचे नाही. हे झाले माझ्या गुरूंबद्दल पण माझे आणखी गुरू आहेत ते म्हणजे माझे आई वडील. ज्यांनी कधीच मला हट्ट केला नाही की तू कामाला जा आणि पैसे कमवून घर चालव. परंतु मी देखील असे नोकऱ्या करायचो की जे फक्त सकाळी असायचे आणि मग संध्याकाळी नाटकाला वेळ द्यायचो मग तो सामना प्रतिनिधी चा जॉब असू द्या, नाट्य परिषदेचा क्लार्क किंवा एखाद्या कंपनीच्या मार्केटिंग चा जॉब असू द्या सगळे जॉब मी केली आहेत. मिमिक्री नंतर निवेदन, बतावणी करू लागलो आणि अशाच एका कार्यक्रमात माझी जोडीदार म्हणजेच माझी बायको विद्या भेटली. आज आमच्या घरामध्ये सगळे कलाकार आहेत ते बोलतात ना की कला ही रक्तातच असावी लागते त्याच गुणधर्माला अनुसरून माझी मुलगी ही वयाच्या पाचव्याच वर्षी चांगला अभिनय आणि नृत्य करू लागली आहे.
आता ह्याच क्षेत्रामध्ये आम्ही चांगला जम बसवला आहे तसेच आपल्या कलेमधून कलाकारांमध्ये समाजकार्य करण्यासाठी संतोष लिंबोरे दादा यांचे लावणी महासंघ मध्ये मी सदस्य झालो. आत्तापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि कार्यक्रम मधून मी माझी कला सादर केली आहे.
बाकी काय सांगायचे कलाकारांसाठी प्रत्येक दिवस हा स्ट्रगलच असतो. आजचा प्रयोग झाला मग आता उद्याचे काय ह्या मध्येच त्याचे संपूर्ण आयुष्य जाते.
धन्यवाद