
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही. आणि वाढीव किमतीचे ठेके दिले जात आहेत. तसेच महिला बचत गटांना ठेके देण्याचा नियम असताना महिला बचत गटाच्या नावे ठेके घेतले जातात मात्र महिला बचत गटाच्या आड दुसरेच कोणी उद्यान देखभालीचा कारभार सांभाळतात.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही अशा आशयाची तक्रार तसनीफ शेख, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक उपाध्यक्ष वसई विरार जिल्हा यांनी केली असून त्यांनी सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती आय यांना दिली आहे. प्रभाग समिती आय हद्दीत अनेक सार्वजनिक उद्याने आहेत. त्यापैकी वसईतील किल्ला गार्डन रु. १२, ०००/-, वसई न्यायालयाच्या बाजूला असलेला बगीचा रु. १२,०००/-, चिमाजी आप्पा रु. २५,०००/-, हुतात्मा स्मारक ताम तलाव उद्यान रु. ५३,०००/-, अशा प्रकारे उद्यान देखभाल खर्च महानगरपालिकेकडून दिला जातो. ठेक्यामधील अटी व शर्ती प्रमाणे देखभालीचे काम ठेकेदाराकडून केले जाते का? वास्तविक देखभालीवर किती खर्च होतो व महानगरपालिकेचा किती रकमेचा ठेका आहे, या बाबत लेखा परीक्षण व्हावे. यातून मोठा भ्रष्टाचार उघड होईल.
सदर प्रकरणी तसनीफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीवर प्रभाग समिती आय कडून कोणतीही कारवाई झाली नाही. कारवाई का झाली नाही, याबाबत आयुक्तांनी चौकशी करावी. प्रभारी सहाय्यक प्रदीप आवडेकर यांची ठेकेदारांशी सेटिंग असावी, त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही.
युवा शक्ती एक्सप्रेसमध्ये सदरचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर वृत्ताची ही दखल न घेता सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर यांनी अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालविला असून आयुक्तांनी यांची दखल घेऊन कठोर कारवाई करावी.
