
वसई (प्रतिनिधी):
वसई उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक अवस्थेत आहे. शासनाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपाशीच असा रस्ता असणे ही दुर्दैवी गोष्ट असून सामान्य नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन गंभीरपणे पाहत नसल्याचे यावरून दिसून येते.
रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटण्याचा धोका आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत येथे मोठी गर्दी असते. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही या रस्त्याची दुरुस्ती केली गेली नाही.
“जर उपविभागीय कार्यालयासमोरच रस्त्यांची ही अवस्था असेल, तर इतर अंतर्गत भागांतील रस्त्यांचे काय?” असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
वसई तालुक्यातून अनेक नागरिक जमीन मिळकतीचे दावे, दाखले, विविध परवानग्यांसाठी या कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालयासमोरच रस्ता असुरक्षित असणे म्हणजे शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
स्थानिक आमदार, नगरसेवक, तसेच पालिकेच्या बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्
