
भाजपा, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. खरे यांचा आरोप !
विरार दि. १०/०४/२०२५, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग समिती ए, बी, सी, डी आणि एफ चे उप अभियंता श्री. सतीशकुमार सूर्यवंशी हे ठेकेदारांसोबत पार्टनरशिप ठेऊन ऍडव्हान्स मध्ये कामे करून घेत असल्याने चौकशी समिती नेमून कारवाई करण्याची मागणी नालासोपारा विधानसभेचे आमदार मा. राजन जी नाईक आणि महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेत श्री. सतीशकुमार सूर्यवंशी हे उप अभियंता या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे ए बी सी डी व एफ या ५ प्रभाग समितीचा कार्यभाग आहे. श्री. सतीशकुमार सूर्यवंशी यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून लहान-मोठी विशेषतः १० लाख पेक्षा कमी रकमेची रु २७३ करोड रकमे पर्यंतची अनेक कामे करून उप अभियंता श्री. सतीशकुमार सूर्यवंशी हे ठेकेदारांसोबत पार्टनरशिप ठेऊन ऍडव्हान्स मध्ये कामे करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचारातून उप अभियंता श्री सतीश कुमार सूर्यवंशी यांनी करोडो रुपयाची माया गोळा केली असल्याचा आरोप प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केला.
नालासोपारा मतदारसंघाचे आमदार श्री राजन जी नाईक आणि महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या कडे केलेल्या तक्रारीत प्राध्यापक डी. एन. खरे यांनी पुरावा सुद्धा दिला असल्याचे सांगितले.
प्रभाग समिती- एफ, पेल्हार कार्यक्षेत्रातील कोपर येथील आरोग्यवर्धिनी चे करण्यात आलेले बांधकाम हे ठेकेदारांची पार्टनरशिप ठेवून ॲडव्हान्स मध्ये करण्यात आले असल्याचा आरोप प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केला. अशा प्रकारे भ्रष्टाचारी उप अभियंता श्री. सतीशकुमार सूर्यवंशी यांनी ए बी सी डी व एफ या ५ प्रभाग समिती मध्ये २७९ कामे ठेकेदारांसोबत पार्टनरशिप ठेऊन ऍडव्हान्स मध्ये करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केला.
तसेच या प्रकरणाची खोली व अपहार केलेल्या रकमेचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करून उप अभियंता श्री. सतीशकुमार सूर्यवंशी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केली.