दिनांक ०९ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘बी’ नालासोपारा, प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार व प्रभाग समिती ‘एफ’ व ‘जी’ अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती ‘बी’ मधील १) सर्व्हे नं.२०७, प्रगतीनगर, नालासोपारा पूर्व परिसरात एकूण २७५० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या व ११ रूम असलेल्या अनधिकृत चाळीवर तसेच २) प्रगतीनगर, सर्व्हे नं.६८, नालासोपारा पूर्व परिसरातील ४०० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत गॅरेजवर प्रभाग समिती ‘बी’ चे प्र.सहा.आयुक्त श्री.दयानंद मानकर यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी प्र.सहा.आयुक्त श्री. दयानंद मानकर, अतिक्रमण विभाग प्रमुख , महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार मधील कुंभारपाडा, चंदनसार, विरार पूर्व येथे ४ अनधिकृत रूम्स निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग, प्र.सहा.आयुक्त श्री. गणेश पाटील, कनिष्ठ अभियंता केयूर पाटील अतिक्रमण विभाग प्रमुख विजय गोतमारे व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रभाग समिती ‘एफ’ मधील गॅस गोडाऊनच्या मागे, वालीव, वसई पूर्व या परिसरात एकूण २८०० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत आर.सी.सी. गाळ्यावर प्रभाग समिती ‘एफ’ मध्ये श्री.अजित मुठे, उप-आयुक्त अतिक्रमण विभाग यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभाग कनिष्ठ अभियंता किशोर पोवार, केयूर पाटील व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
तसेच प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत बजरंग धाबाच्या मागे, सातीवली या ठिकाणी एका गाळ्याच्या १२०० चौ.फुट क्षेत्रफळ बांधकाम केलेल्या अनधिकृत पोटमाळ्याचे बांधकाम प्रभाग समिती ‘जी’ वालीव चे सहा.आयुक्त श्रीम.धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची करण्यात आले.त्याचप्रमाणे प्रभाग ‘जी’ मध्ये असलेल्या ४००-४०० चौ.फुटाच्या दोन गाळ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त श्रीम.धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता श्री.कल्पेश कडव, लिपिक श्री.विजय नडगे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिनांक ०९ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत अंदाजे ८००० चौ.फुटांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेमार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
मा.आयुक्त महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर नियमित कारवाई सुरु करण्यात आली आहे.


                                                                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *