एनयुजेएम चे उत्तम समन्वय कार्य!

पालघर : सध्या जीवनावश्यक मदतीची गरज जास्त आहे.
स्थानिक तसेच कामाधंद्यासाठी स्थलांतरित नागरिक यांना लाँकडाऊन मुळे रोजचं जगणं कठीण झालय. सरकार काम करतय पण कुठेतरी समन्वय राहातोच. अशावेळी समन्वयातून पत्रकारांसह गरजू लोकांना सहकार्य करणेसाठी समन्वयाचे काम नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र करत आहे.
मिळेल तिथून मदत घेऊन गरजूंना देणे आणि सकारात्मक माहिती सर्वापर्यत पोहोचवणे.
आरोग्यसेवेतील त्रुटी निदर्शनास आणून त्या तातडीने कार्यवाही करून काम गतिमान करणे ही कामं युनियन करतेय. ही माहिती प्रत्यक्ष कृतीमुळे सर्वत्र पोहोचली असल्याने सहकार्य साठी अनेकजण संपर्क करत आहेत.
असाच एक मेसेज पालघरला मदत हवीय म्हणून एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर यांना
मृद व जलसंधारण मंत्री
मंत्री शंकरराव गडाख
यांचे विशेष कार्य अधिकारी
ज्ञानोबा रितापुरे यांचा आला.
आणि काम सुरु झाले… मूळ उस्मानाबादचे राहणारे आणि पालघर जिल्ह्यात उमरोळी येथे कष्ट करणारे नागरिकांना उपाशीपोटी राहत असल्याची कल्पना आली.
राज्य कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी फोनवरुन संबंधित महिलांशी संपर्क केला, माहिती घेतली, दिलासाही दिला ‘आम्ही आहोत सोबत!’
एनयुजेएम पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई यांनी पालघर जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी राहुल भालेराव यांच्याशी संपर्क साधून पालघर जिल्ह्याचे तहसीलदार उज्वला भगत यांना उमरोळीतील अन्नधान्याचा साठा संपत आलेल्या नागरिकांची यादी बनवून पाठवली. आधी दिलेले धान्य हे खूपच तुटपुंजे असल्याचेही समोर आले.
पालघर तहसीलदार भगत यांनी स्थानिक उपसरपंच यांना संपर्क करून अन्नधान्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्स चे भान राखून अन्नधान्याचा पुरवठा केला.
या झालेल्या मदतीने उमरोळी तील उस्मानाबाद नागरिकांनी एनयुजेएम चे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.तसेच रितापुरेजींनीही समन्वयासाठी एनयुजेएम चे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *