
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद मार्फत सिद्धाराम सालीमठ ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प पालघर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय बँक अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून आज या कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
तुषार माळी , प्रकल्प संचालक. जि. ग्रा. वि. यंत्रणा यांच्या उपस्थित ही कार्यशाळा घेण्यात आली.
आर्थिक समावेशन मध्ये बँकेची भूमिका, तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारें स्वयं सहाय्यता समूहाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करणे बाबतचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. तसेच बँकेच्या अडचणी आणि उद्धिष्ट पूर्ण करणे बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत बँक ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा व इतर बँकांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यशाळा करिता जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा आर्थिक साक्षरता अधिकारी पालघर सर्व बँकेचे जिल्हा समव्यक सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक तसेच उमेद अभियानाला जोडलेले बँक सखी आर्थिक साक्षरता सखी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.