

मागील महिन्याभरापासून उमेळा साकाई नगर अमोल नगर मरियम नगर विजय पार्क डायस अँड परेरा नगर रोज नगर नायगाव कोळी वाडा भागात अत्यंत अपुरा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे एन उकाड्यात नागरिकांची पार दैना उडाली आहे या भागात कुठल्याही प्रकारे पर्यायी पाण्याची व्यवस्था नाही खारटन जमीन असल्याने इथे तलाव विहीर बोयर वेल नाही त्या मुळे जेवणआंघोळ बाथरूम करता पाणी नसल्याने महिला भगिनी त्रस्त झाले आहेत येथील नागरिक पूर्णपणे महापालिका व्यवस्था वर अवलंबून आहेत. महापालिका प्रशासना च्या नियोजन शून्य भ्रष्ट कामकाज मुळे सतत पाईप लाईन फुटणे पंप नादुरुस्त होणे वीज प्रवाह खंडित होणे अशा विविध कारणांनी पाणी पुरवठा खंडित होत आहे प्रशासनाच्या निष्क्रिय पणा मुळे टँकर माफिया आणि बोगस बिसलेरी बॉटल माफिया चा उधोग जोरात सुरू आहे गेल्या वर्षी 22 मार्च 2020 रोजी लॉक डाऊन सुरू झाले मोठ्या प्रमाणात लोक घरात कैद होती पाण्याचा वापर वाढला होता तरी देखील जून महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे त्यासाठी महापालिका प्रशासन च्या संगमतने मोठ्या प्रमाणात पाणी बांधकाम साठी वापरले जात आहे म्हणून ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे आयुक्तांनी त्वरित बांधकामे स्थगित करावीत अशी मागणी भाजप सरचिटणीस नंदकुमार महाजन यांनी केली आहे बोगस सी सी इमारतींना नळ जोडणी दिल्या आहेत त्या मुळे प्रामाणिक करदाता त्याच्या नैसर्गिक अधिकारापासून वंचित आहेत नवीन नळ जोडणी करीता लाखो रुपये उकळले जात आहे अशा भ्रष्ट कामकाज मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यासाठी आज प्रभाग समिती आय वसई येथे भाजप चे महिला मोर्चा सरचिटणीस अभिलाषा वर्तक यांनी शिष्टमंडळ सह सहायक आयुक्त श्री प्रताप कोळी ह्यांना भेटण्यासाठी आले असता नेहमी प्रमाणे कोळी मीटिंग च्या जाळ्यात अडकले होते त्या मुळे पाणी पुरवठा चे लिपिक चीमकर ह्यांना निवेदन देण्यात आले आणि अमोल नगर मरियम नगर विजय पार्क डायस अँड परेरा नगर नायगाव कोळीवाडा परिसरात महापालिकेनं त्वरित टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप महिला मोर्चा सरचिटणीस अभिलाषा वर्तक ह्यांनी दिला आहे
