

पालघर- उर्मिला संजय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा चिंचणी पाटील वाडा यांना अँड्रॉइड मोबाइल व ई-लर्निंग अभ्यासक्रमाचे साहित्य देण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गजानन राउत तर प्रमुख पाहूणे म्हणून संजय म्हात्रे व युक्ता म्हात्रे ऊपस्थित होते त्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान ठाणे येथील उर्मिला संजय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान देत असून या अनुषंगाने ग्रामीण भागातही या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आणि सामाजिक कार्य हाती घेण्यात येतात याच माध्यमातून सदर ट्रस्टद्वारे चिंचणी येथील शाळेला देण्यात आलेल्या ई-लर्निंग साहित्यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा यांना शासनाने अनेक उपाय योजना दिल्या आहेत पण यापेक्षाही जास्ती पटसंख्या वाढ व्हावी याकरिता ग्रामीण भागातील शिक्षक हे आपल्या परिने प्रयत्न करून शाळांचा दर्जा अजुन ऊंच व्हावा याकरिता शिक्षक अनेक सामाजिक संस्थेमार्फ़त मदत मिळवत आहेत.
याचाच एक आदर्श चिंचणी पाटीलवाडा शाळेचे पदवीधर शिक्षक अंकलेश्वर पाटील मुख्याध्यापिका मनीषा बारी,दिलीप मुळे करत असून यातून ते शाळाबाहय मुले यांना शिक्षणाच्या मूळप्रवाहात आण्याचा प्रयत्न करत आहेत याचेच उदाहरण म्हणजे चिंचणी पाटीलवाडा शाळा ई-लर्निंग झाली असल्याने विद्यार्थी यांना आता डिजिटल शिक्षण प्रणालीमधे शिक्षण घेणार आहेत त्यामुळे ग्रामस्थ आणि पालकांकड़ून या शिक्षकांचे कौतुक केले जात आहे