केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई आणि परिसरात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत ते अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीकेचे प्रहार केले आहेत.

वसई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज वसई विरारमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी वसई विरारमध्ये अनेक खड्डे पडल्याचे सांगितले. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, ‘नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे नव्हे. तर ते मातोश्रीवरून चालविले जात असल्याचे म्हणाले. तसेच शिंदे हे फक्त सही पुरते नगरविकास मंत्री असून ते  मार्ग शोधत असल्याचेहीचाही गौप्यस्फोट राणे यांनी यावेळी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई आणि परिसरात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत ते अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीकेचे प्रहार केले आहेत. आज त्यांची यात्रा वसई विरारमध्ये असताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला त्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वसई विरारमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात राणे बोलत होते. यावरून विषय शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना राणे म्हणाले की,  ‘नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे नव्हे. तर ते मातोश्रीवरून चालविले जात आहे. तसेच शिंदे हे फक्त सही पुरते नगरविकासमंत्री असून ते मार्ग शोधत आहेत.’
राणे यांच्या ‘शिंदे मार्ग शोधत आहेत’ या विधानावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. माध्यमांनी शिंदे भाजपत येणार आहेत का? असे विचारल्यावर राणे म्हटले की, शिंदेच काय अनेक जण भाजपत येण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *