

१) सौम्य अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना (50 वयोगटाखालील) घरी सोडतेवेळी रितसर प्रमाणपत्र देणे जेणेकरून कामधंद्याला, नोकरी , कार्यालयात रुग्ण ते सादर करू शकेल.
२) विलगीकरण कक्षात जेवण पुरवणाऱ्या संस्थांवर अतिरिक्त बोझा असल्याचे कळते, वविमनपा ने शासकीय शिवभोजन योजना अंतर्गत जेवण कोविड रुग्णांकरीता उपलब्ध करावे व शासनाच्या योजनेचा प्रसार पण होईल.
३) ५५+ वयोगटातील कुठल्याही व्यक्तीला (डॉक्टर, परिचारिका, सफाई काम- मामा-मावशी) ज्यांना इतर दुर्धर आजार आहेत अशांना कोविड ड्युटीतून वगळावे.
४) समन्वयाचा अभाव आहे यात रुग्णांची कर्मचाऱ्यांची हेळसांड होत आहे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे याकरिता हेल्पलाईन असण महत्वाच आहे.
५) सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा विकसित करण्यात यावी.
६) डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करायचा प्रयत्न करावा. त्यांच्या समस्या स्वत: जाणून घ्या व त्यानुसार उपाययोजना केल्या तर अधिक प्रमाणात सहकार्य मिळेल असे मत व्यक्त करतो. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. *१५० रुग्णांच्या मागे १ डॉक्टर हि दुर्दैवी बाब आहे.*
७) “चेस द व्हायरस”, “मिशन झीरो” सारखे उपक्रम हाती घेण्यात यावी व वसई विरार कोविडमुक्त करावे.
८) प्लाझ्मा डोनर बाबतची जनजागृती वविमनपाने करावी. समाज प्रबोधन कार्यक्रम सुरू करून नागरिकांच्या मनातील जी कोरोना बद्दलची भीती निर्माण झाली आहे ती भिती घालवण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे.
९) एखाद्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब होत आहे अस मत व्यक्त करत आहे.
रुग्णालयातून रुग्णांना मिळणारे अवाजवी देयक तक्रार, शासकीय योजनेतून कोविड उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांची तक्रार यासाठी तक्रार निवारण्याची मार्गदर्शक सुचना नियमावली जाहीर करण्यात यावी व अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी अायुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी.
१०) खासगी कोविड अहवाल 24 तासात येत असून सरकारी कोविड अहवाल 48 तास ते 6 दिवस लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यातही एकाच रुग्णाचे वेगवेगळ्या ठिकाणी केलेले अहवाल पॉजिटीव / निगेटिव्ह दिसुन येत असताना विश्वासाहर्ता डळमळीत होत आहे.
११) पीपीई किट्स, मास्क इ सुरक्षा साधनांची गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे मत काही परिचारिकांनी व्यक्त केले याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
१२) कोविड + गर्भवती महिलांकरीता वविमनपाचे एक माताबालसंगोपन केंद्र राखीव ठेवावे.