
नागपूर- कोरोना सारख्या संकटात एकीकडे फिल्ड वर निघून पत्रकारिता तर दुसरीकडे अश्या परिस्थिती नागपुरात फसलेल्या लोकांना त्यांचा परिसरात शासनाचा मदतीने सुखरूप पोहचविण्याचे काम करत आहेत नागपूर निवासी कृष्णा मस्के, मुंबई दूरदर्शन सह्याद्री न्युज चे नागपूर प्रतिनिधी आणि नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र चे नागपुर समन्वयक कृष्णा मस्के नेहमी सामाजिक कामात पुढे असतात, अश्यात संचारबंदीत फिल्ड वर सतत काम करतांना कृष्णां यांना इथे थांबलेल्या लोकांची व्यथा जवळून कळताच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय सोबत त्यांनी अशा लोकांची मदत करायला सुरुवात केली, शासना तर्फे सर्व परमिशन चे पत्र घेत कृष्णां मस्के हे एकही रुपया न घेता आपल्या स्वतःच्या खाजगी वाहन ने लोकांना नागपूर च्या बाहेर त्यांच्या इप्सित स्थळी सोडण्याचे काम नेटाने करीत आहेत.
इथे निवारा केंद्रात असलेल्या दोन पैकी एकाच्या आईचे व एकाच्या बायकोचे निधन झाले.
मध्यप्रदेशातील श्रीराम नंदू याचे आईचे निधन झाले दि२३ एप्रिलला झाले. उत्तरप्रदेशातील हरदोईचे शिवराम खुशवाह यांचे गरोदर पत्नीस देवाज्ञा झाली.
आपल्या जीवलग व्यक्तीचे अंतिम दर्शनासाठी दोघेही अस्वस्थ होते.
या दोघांना त्यांचे गावी पोहचवण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे मनात
कृष्णा म्हस्के हे विश्वसनीय नाव येणे सहाजिकच होते.
सर्व सरकारी मंजुरी आणि पोलीस सहकार्याने एक चालक सोबत घेऊन दोघांनाही त्यांचे गावापर्यंत पोहोचवण्याचे कृष्णाचे सारथ्य आणि त्या राज्यातील पोलिसांचे सहकार्याने पुर्ण केले गेले.
दोघांची मजुरांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या अंतिम संस्काराला पोहोचता आले.
याआधी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील अडचणीत सापडलेल्या महिलेला तिच्या बाळासह सुरतला आपल्या स्वतःच्या गाडीने इंधन खर्च स्वतः करून सुखरूप सोडून येण्याचे काम कृष्णा यांनी केले.
एनयुजेएम चे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार आणि अध्यक्ष शीतल करदेकर यांनी कृष्णा म्हस्के यांचे कामाचे कौतुक आणि अभिनंदन केले.