

ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.आपण व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा कारण शर्मा यांनी दिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये प्रदीप शर्मा निवडणूक लढणार असल्यामुळे पोलीस खात्यातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज 4 जुलै रोजी केलेला आहे. त्यावर अद्याप पोलीस महासंचालकांनी निर्णय घेतलेला नाही. मात्र प्रदीप शर्मा हे मुंबईतून अंधेरी पूर्वमध्ये किंवा नालासोपार्यातून शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. उत्तर भारतीयांची निर्णायक मते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांना नालासोपारा मतदारसंघातून 26 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.