बहुजन महा पार्टी तर्फे आजाद मैदानावर एन.आर.सी व सी.ए.ए.या कायद्याविरोधात महाआंदोलनचे आयोजन करण्यात आले होते.सदरचा कायदा केंद्र शासनाने रद्द करावा व या कायद्यातील तरतुदी तपासून भारतीय नागरिकांना कोणकोणते कागदपत्रे दाखवून नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे ?किती वर्षांपासून वास्तव करत असल्याचा पुरावा दाखवावं लागणार आहे ? तसेच भारतात राहणाऱ्या मुस्लिम लोकांना कोणकोणती कागदपत्रे दाखवावी लागेल ? 15 वर्षाचा पुरावा असल्यास ग्राह्य धरले जाणार की नाही ? व या कायद्याचा लाभ मुस्लिम समाज व इतर कोणत्या समाजाला होणार नाही याबाबतची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी केंद्र शासनाकडे महा आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. तसेच पक्षातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी,कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांना पत्र देऊन लेखी स्वरूपात मागणी देण्यात यावे असे पत्र पाठविण्यात आली आहे. केंद्र शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात माहिती न दिल्यास आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी सांगितले आहे.सदरच्या कार्यक्रमात अखिल भारतीय जनहित सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफिक अन्सारी,लोक आधार संघटनेचे अध्यक्ष हनुमंत देवकर, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परेश घाटाळ,महाराष्ट्र बंजारा सेनेचे अध्यक्ष राम राठोड,मोबीन चौधरी,रवींद्र गोरे,अजय पाल,सैफुल्ला चौधरी,अन्वर हुसैन, शाहीन सय्यद, जावेद शेख,मैमुल्ला,कलाम व अन्य इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *