नागपूर आज बुधवार दि 18 /12/2019 रोजी विधान भवनात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे शिष्टमंडळ दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली भेटले शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री बर्नड डिमेलो सरचिटणीस संजय कोळी उपाध्यक्ष ऍड कमलाकर कांदेकर युवा अध्यक्ष पुनित तांडेल यांचा समवेत मच्छिमार प्रतिनिधी होते एलईडी लाईट आणि परिस्थितीने संपूर्ण मच्छीमारांचा संसार उद्ध्वस्त झालेले मासेमारी धंदा उध्वस्त झालेल्या ह्या संदर्भात उद्धव साहेबांची सविस्तर चर्चा केल्यानंतर उद्धव साहेबांनी हे मान्य केले की शासनाने काढलेले दोन जीआर त्याची अंमलबजावणी होत नाही हे माझ्याही निदर्शनांस आलेला आहे सरकारने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन मासेमारी करण्यास बंदीचा कायदा आला त्या कायद्यामध्ये 495 मासेमारीला दिलेले परवाने त्वरित रद्द करावेत आणि फक्त पाचशे मीटर ची तीसुद्धा कोकणामध्ये पाचशे मीटरच्या जाळीचे मासेमारी 182 फिगर करण्यात आली होती आणि डहाणू पासून ते मुरुड जंजिरा पर्यंत बाराही महिने बंदी असताना ससून डॉक बंदरांमध्ये सातशे बोटी मिरकरवाडा बंदरांमध्ये 400 व सागर आक्षी अलिबाग 300 बोटी असं दीड ते दोन हजार बोटी बेकायदेशीर परवानगी नसताना मासेमारी करत होते आणि ह्याला माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा वरदहस्त होता आताचे प्रधान सचिव अनुपकुमार मत्स्यव्यवसाय आणि सहआयुक्त सागरी श्री राजेंद्र जाधव यांच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनांस तांडेल यांनी निदर्शनास आणून दिले आणून दिल्यानंतर त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी व या दोन हजार भांडवलदारांच्या अनधिकृत ट्रॉलर चालू आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व एकही बोट किनारपट्टीवर बेकायदेशीर चालू असेल त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करणे त्या बोटी जप्त करणे व या पुढे विना परवाना मासेमारी होऊ नये या करिता कठोर पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधीकार्याना देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *