

दापोली(प्रतिनिधी)-ओबीसी संघर्ष समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका संपर्क प्रमुखपदी दाभीळ गावचे सुपूत्र, उन्हवरे विभागाचे कुणबी युवाध्यक्ष,युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल मोरे यांची नियुक्ती ओबीसी संघर्ष समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांनी नुकतीच केली असून कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभाग संलग्न कुणबी युवा संघटनेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा,अभिमानाचा तुरा खोवला गेल्याचा आनंद संपूर्ण पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे.
ओबीसी वर्गाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संविधानिक लढा लढण्याची तयारी व ओबीसी जातिनिहाय जनगणना २०२१ होणे बाबत आम्ही यापुढे कायम अग्रेसिव्ह असल्याचे मत विशाल मोरे यांनी व्यक्त केले आहे.
विशाल मोरे अनेक सामाजिक संघटनांची जबाबदारी अगदी यशस्वीरीत्या सांभाळत असून यापुढे ओबीसी समुहातील सर्व बांधवांना बरोबर घेऊन तालुक्यात प्रभावीपणे काम करणार असल्याचे ते पत्रकारांशी बोलत होते.