पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या रासलीलेचा पंखा ‘फास्ट’

विरार-दोन दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथे अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वसई विरार पालिकेच्या अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण विभागातील ठेका कनिष्ठ अभियंत्यांच्या रासलीलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या व्हायरल व्हिडीओत प्रभाग समिती एफ चे कनिष्ठ अभियंता भीम रेड्डी, तसेच एक बांधकाम माफिया वसईतील पंखा फास्ट या वादग्रस्त बार मध्ये रासलीला करताना दिसत आहेत.दरम्यान सदरच्या व्हायरल व्हिडिओमुळे बांधकाम माफीयांकडून पालिकेच्या ठेका अभियंत्यांना शरीर सुखासाठी सुंदर ललना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे ४ वर्षांपूर्वी पालिका अभियंत्यांनी दारू पार्टीतील नागीण डान्सचा व्हिडीओ समोर आला होता.परंतु त्यावेळी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी त्या दारू पार्टीतील ११ अभियंत्यांवर निलंबणाची कारवाई केली होती.परंतु कालांतराने त्या नागीण डान्स मधील अनेक अभियंते पालिकेत पुन्हा रुजू झाले आहेत.त्यामुळे आता पालिका प्रशासन या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी काय कारवाई करणार याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.
वसई विरार पालिकेतील पेल्हार,चंदनसार तसेच वालीव प्रभाग हे अनधिकृत बांधकामांचे हॉटस्पॉट ठरत आहेत. असे असताना पालिकेकडून यावर ठोस उपाययोजन करणे आवश्यक होते. यातील महत्त्वाची उपाययोजना म्हणजे कार्यतत्पर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करणे क्रमप्राप्त होते. परंतु पालिकेकडून आजपर्यंत कार्यतत्पर अधिकारी/कर्मचाऱ्यांची नेमनुक करण्याऐवजी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.परिणामी पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा आलेख कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाय या अनधिकृत बांधकामामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आतातरी अनधिकृत बांधकामाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *