
करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हापरिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ साहेब यांची भेट माननीय नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला केदार काळे यांनी घेतली.
तेव्हा नगराध्यक्षांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ यांना पालघर नगर परिषद क्षेत्रात करोना प्रतिबंधक लस मागील एक महिना अत्यंत अल्प प्रमाणात मिळत असल्याबद्दल सांगितले.
पालघर नगरपरिषदेने आठ केंद्रामध्ये लसीकरण केंद्र सुरू केली होती पण करोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा अनियमित व कमी व्हायला लागल्यामुळे ती केंद्र बंद करावी लागली.
असेही खासदार श्री राजेंद्र गावित साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास नगराध्यक्षांनी आणून दिले. पालघर शहरात फक्त सोळा टक्के जनतेचे लसीकरण झाल्याचेही सांगितले.
तेव्हा जसा जसा कोटा मिळेल त्या पद्धतीने पालघर नगरपालिका क्षेत्राची लस उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.