
शिवसेना (बाळासाहेबांची (शिवसेना) गटातर्फे दिनांक १० मार्च रोजी महिला दिना निमित्त नालासोपारा पूर्व येथे आनंदात साजरा करण्यात आला .
अनेक मान्यवरांच्या उपस्थतीत कार्यक्रम संपन्न झाला.
या निमित्याने महिलांसाठी अनेक खेळ बक्षीस आणि प्रमाण पत्र ही देण्यात आले .
महिलांसह अनेक व्यक्तींना ही मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले . या कार्यक्रमात महत्वाचा भाग म्हणजे राजमाता जिजाऊ संभाषण नाट्य होते . आणि नाट्य खूप प्रेरणा देणारे होते . सर्व नाट्य कलाकार आवाजाच्या जोरावर जे सौंदर्य उभे केले ते अद्भूत होते . तसेच कर्मवीर स्नेहा जावळे यांनी महिलांना महिला दिनाचे विशेष सांगून महिलांशी संवाद साधला.
तसेच खेळी मेळीच्या वातावरणात हळदी कुंकू कार्यक्रम महिलांनी पार पाडले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत जाधव उपशहर प्रमुख, प्रतीक कुडूपकर विभाग प्रमुख,सौ. दीपाली ताई राणे (उप तालुका संघटक )सौ. सोनल ठाकूर (उपशहर संघटक) सौ. साक्षी डांगे,सौ. अमृता शेलार, सौ. स्नेहा परब, सौ. दिनीषा मोरे, सौ. सुप्रिया सावंत यांच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.