

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि
काषाय प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित
‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन २३ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे होत आहे.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदे तर्फे दिला जाणारा ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार’
वसई येथील प्रसिद्ध कवी श्री संजय पाटील यांना जाहीर झाला आहे. २३ जानेवारी रोजी सकाळी आकरा वाजता सदरील प्रकाशन सोहळ्यात हा पुरस्कार कवी संजय पाटील यांना जेष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री, संजय पाटील यांच्या वर साहित्य क्षेत्रातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.