
काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दाखल केलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात असे नमूद केले आहे की, गाव मौजे गास येथील त्यांच्या सामाईक मालकीची शेतीची जमीन सर्वे नंबर ९/१६ ही जमीन त्यांची मालकीची आहे.व सर्वे नंबर १९७/९ ही जमीन देखील त्यांची मालकीची शेतीची जमीन आहे.मी बहुजन महापार्टी या पक्षामधून वांद्रे पश्चिम येथून निवडणूक लढवित असल्याने माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण किती उमेदवार निवडणूक लढवित आहेत याची मी माहिती निवडणूक कार्यालयातून घेतली असता मला असे आढळून आले की, काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांनी निवडणूक लढणेकामी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिलेली आहे.त्यांनी सर्व नंबर ९/१६ ही जमीन शासन दप्तरी गावठाण जमीन अशी नोंद आहे. गावठाण जमीन ही आदिवासी,बेघर , गरीब, मजदूर लोकांच्या घरासाठी आरक्षित असलेली व मालकी हक्क शासनाचा असतो अशी जमीन आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांनी सदर जमिनीचा उल्लेख करून जमीन गरिबांसासाठी असलेली राखीव जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत का? तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिलेली आहे हे जमिनीचा ७/१२ उतारा पाहून सिद्ध होत आहे.तसेच सर्वे नंबर १९७/९ या जमिनीचा शासन दप्तरी ७/१२ उतारा उपलब्ध नाही त्यामुळे आसिफ झकारिया यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्रातील मजकूर खोटे आहेत हे सिद्ध होत असल्याने मी ताबडतोब दिनांक ३०/१०/२०२४ रोजी पेपर छाननी च्या दिवशी दुपारी १ : ०० वाजता लेखी हरकत वांद्रे पश्चिम येथील निवडणूक अधिकारी यांना देण्याचा पर्यंत केला होता परंतु त्यांनी माझा पत्र स्वीकारला नाही.त्यामुळे मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शमसुद्दीन खान यांना याबाबत कळविले असता त्यांनी bahujanmahaparty@gmail.com या पक्षाच्या email id वरून केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना माझे तक्रारी अर्ज पाठवून तशी नोंद केलेली आहे.परंतू अद्याप कारवाई न झाल्याने मी आज दिनांक १६/११/२०२४ रोजी पुन्हा आसिफ झकारिया यांच्या विरोधात पुन्हा तक्रारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने नियमाप्राणे कारवाई करावी अशी माझी मागणी आहे या प्रकरणाकडे निवडणूक आयोग नोटीस काढून काय कारवाई करेल याकडे सगळ्याचे लक्ष लागून आहे.