

15 वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वसईतील राजकारणात व समाजकारणात सक्रिय , वसईतील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे, गरीब , वंचित व अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा हरित वसईचे प्रणेते, जेष्ठ साहित्यीक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनाखाली “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारच्या” माध्यमातून MMRDA च्या प्रारूप प्रादेशिक विकास आराखड्या विरोधात यशस्वी आंदोलन उभारणारे, बुलेट ट्रेन, CZMP, इ विविध पर्यावरण विघातक प्रकल्पाविरोधात आवाज उठविणारे पर्यावरण प्रेमी श्री. समीर सुभाष वर्तक जी यांची आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 136 व्या स्थापनादिनी पर्यावरण सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश कमीटीचे अध्यक्ष मा.ना. बाळासाहेब थोरात यांच्य हस्ते नेमणुक करण्यात आली.
