
काका क्षीरसागर यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. सोपाऱ्यातील ही अस्वस्थता लवकर दूर होणारी नाही. या भागात शिवसेनेला आजुबाजूच्या भागातून ताकद मिळाली पाहिजे.
अशा भावना ज्येष्ठ नेते राजाभाऊ जाधव यांनी या शोकसभेत बोलताना व्यक्त केल्या.
सोपारा भागात श्रद्धा राणे, प्रविण म्हाप्रळकर, छाया पाटील यांच्या नगरसेवक होण्यात काका क्षीरसागर यांचे योगदान महत्त्वाचे होते. संघटना वाढविण्यासाठी मला काकांची मोठी मदत झाली होती.अशा शब्दांत सेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष चव्हाण यांनी आपले मत मांडून पक्षातर्फे श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी सुद्धा आपल्या सहवेदना या प्रसंगी व्यक्त केल्या.
शिवसेनेचे पदाधिकारी प्रविण म्हाप्रळकर, संतोष टेंबुलकर, सुनिल नार्वेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अमर सवणे यांनी या शोकसभेचे सूत्रसंचलन केले.
बाळकृष्ण क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.