
कामंन भिवंडी त्यामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता या पावसाळ्यात पूर्णपणे उखडला आहे .त्यामुळे याठिकाणी दुचाकी तीन चाकी चारचाकी व मोठमोठे ट्रक पलटी होऊन अपघात होत आहेत . या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे त्या महाराष्ट्रा मृत्यूचा सापळा बनला असल्याचं माजी नगरसेवक सुनील आचोलकर यांनी म्हटलं आहे. कामं भिवंडी मार्गावरील ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध आजारी व्यक्ती गरोदर महिला यांना या रस्त्यावरून जाणे अत्यंत त्रासदायक व वेदनादायक होत आहे .. रस्त्याची डागडुजी एका आठवड्यात न केल्यास तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा कामणगाव चे सुपुत्र माजी नगरसेवक सुनील आचोलकार यांनी दिला आहे
कामंन भिवंडी रस्त्याची यापूर्वी डागडुजी सुप्रीम कंपनी करायची. मात्र त्या कंपनीने आत्ता हा ठेका सोडला आहे . त्यामुळे सध्या हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखरेखीसाठी आहे. रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे नियोजन असणे गरजेचे होते. मात्र याठिकाणी गटारचे कोणते नियोजन नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याचा सखल भागात ठिकाणी साचून वारंवार रस्ते उखडले जातात. परिणामी या ठिकाणी अपघात होऊन जीवित व वित्त हानी होते. ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला .लहान मुलं यांना या रस्त्यावरून जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो रस्त्याच्या दुतर्फा पाणी जाण्यासाठी गटार तथा उघड्या नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून रस्ता पाण्याखाली जातो व वारंवार त्याच ठिकाणी रस्ते उखडतात . त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन नागरिकांचा व वाहनचालकांचा खोळंबा होतो .कालच एक मालवाहतूक ट्रक पलटी झाल्याने या रस्त्याची किती दुरवस्था झालेले आहे याची कल्पना येते सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या डागडुजीच्या नावाने पैसे उकळतात? मात्र रस्ता पूर्ण करत नसून ते काम अर्धवट सोडून दिल जाते. मात्र कागदोपत्री हा रस्ता पूर्णपणे? दुरुस्त केल्याचे भासवले जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक सुनील आ चोळकर यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात या रस्त्यात पडलेले खड्डे तथा पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारांची व्यवस्था न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल याची दखल सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी असे माजी नगरसेवक सुनील आचोलकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जनतेसाठी रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी हा रस्ता सुयोग्य होत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करत राहत असल्याच आचोळक र यांनी म्हटल आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या या रस्त्यावरून नेऊन दाखवा म्हणजे त्यांना या रस्त्याची दुरावस्था किती व कशी व कोणामुळे झाले आहे याची जाणीव होईल .कार्यालयात बसून फक्त हे बिल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होईल असे अचोळकर यांनी म्हटले आहे.