★ “अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित” च्या कामगारांना घेतले धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व
वसई : वसईतील अर्नाळा येथील “अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित” या निम सरकारी संस्थेच्या कामगारांनी धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारल्यानंतर आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अर्नाळा येथील क्षितीज रिसॉर्ट येथे कामगारांनी आयोजित केलेल्या बैठकीत कामगारांना संबोधित केले. यावेळी कामगारांनी त्यांच्या समस्या अभिजीत राणे यांच्या समोर मांडल्या. कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी संबोधित करताना, युनियनची संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी असून कामगारांच्या हक्काचे सर्व न्यायीक अधिकार त्यांना मिळवून दिले जातील सोबत त्यांना त्यांचा मानसम्मान ही मिळेल जो त्यांचा अधिकार आहे असे यावेळी ते म्हणाले. कामगारांकडून प्रभाकर पाटील यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार व युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते. उत्तम कुमार यांनी संबोधित करताना, कामगारांनी कोणाच्या ही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले.
यावेळी भूषण कोळी, हिमेश सावरे, विनोद मेहेर,अशोक पाटील, संजय गुरव, रमाकांत, अनिल घरत आदी कामगार कोरोनाच्या त्रिसूत्रीचे नियम पळून उपस्थित होते.