वसई : पावसाळा सुरू होताच तरुण तरुणी ंना वेध लागतात पावसात मनसोक्‍त भिजुन चिंब होण्‍याचे आणि नदिपात्रात आंघोळ करण्‍याचे.परंतु अनेकदा नदितील पाण्‍याचा व प्रवाहाचा अंदाज न आल्‍याने आजवर अनेक जिव हकनाक गेले आहेत.कामण गावाच्‍या पुर्वेला वाहाणार्‍या नदीमधे दरवर्षी दुरवरुन अनेक पर्यटक नदीतील स्‍वच्छ व निर्मळ पाण्‍यातिल आंघोळीचा आनंद घेण्यासाठी येतात.अनेकजण तर कुटूंबातील सदस्यां बरोबरच आपल्‍या नातेवाईकांना देखील सोबतीला घेवुन येतात.

मात्र असे असले तरी काही हुल्‍लडबाज,दारुडे देखील नदीवर येत असतात.आणि हे दारूडे नदीत आंघोळ करण्‍या ऐवजी,आधि भरपुर दारु ढोसून मग मोठा धिंगाणा नदीमधे व आजुबाजुला घालित असतात.त्‍यामुळे कुटूंबासह आलेल्‍यांना खुपच त्रास सहन करावा लागत असतो.दारू पिवुन झाल्‍या नंतर रीकाम्‍या बाटल्‍या व खाण्‍यासाठी आणलेले पदार्थ नदित व नदी किनारी ईतस्‍तहा फेकुन संपुर्ण नदीकिनारा घाण करुन टाकतात.या पैकी काही अति उत्‍साही व दारूच्‍या नशेत तर्र झालेले नदिकीनारी असलेल्‍या उंच झाडावर चढून तेथुन नदीत उड्‍या मारतात.झाडावरून उड्‍या मारणारांपैकी अनेकांना किरकोळ तर काहिंना गंभिर दुखापती झाल्‍या आहेत.मागील रविवारी दिनांक १४ जुलै.देवकुंडी नदीवर प्रचंड संखेने पर्यटक आले होते.त्‍या मधेच चिंचपाडा वसई येथील लक्ष्‍मण बनसोडे आपल्‍या मित्रांसोबत आला असावा,नदीमधे पाण्‍याचा वेग जरी बेताचा असला तरी न पोहता येणार्‍यानी माहित नसताना पाण्‍यात उतरु नये,लक्ष्‍मण याला पोहता येत होते की नाही ते माहित नाही.परंतु अनेक जण पाण्‍यात आंघोळीचा आनंद घेत असल्‍याने व नदीवर प्रचंड गर्दी असल्‍याने काय घडले समजले नाही,मात्र लक्ष्‍मण सोबत आलेल्या त्‍याच्‍या मित्रांनी वेळीच धावपळ केली असती तर कदाचित एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला नसता.नीसर्गाच्‍या प्रसन्‍न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्‍या पर्यटकांनी सद्‍सद विवेक बुद्‍धि वापरली तर आणि सहकुटंब आलेल्‍या पर्यटकांनी दारूपासून स्‍वताला दुर ठेवले तर अशा दुर्दैवी दुर्घटना भविश्‍यात घडणार नाहीत.निसर्गाचा आनंद घेण्‍यासाठि दारु पिणे गरजेचे आहे का?याचा गांभिर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.कुटूंबासह येणार्‍या महीलांनी या गंभिर बाबीचा विचार करणे आवश्‍यक आहे,जेणेकरून भविश्‍यात लक्ष्‍मण बनसोडे सारखा कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *