भूमाफिया गुप्ता पालिकेचा घरजावई लागतो का?

पोमणमधील दादागिरी करणाऱ्या भूमाफियांना उपायुक्त अजित मुठे यांनी ठेचले; मग कामणमधील अनधिकृत बांधकामांना कधी ठेचणार?

वसई : प्रतिनिधी :

कामणसारख्या आदिवासीबहुल भागात अनधिकृत बांधकामांचा तोरा वाढत चालला आहे. नुकतेच पोमण-शिलोत्तरमधील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईसाठी मैदानात उतरलेल्या उपायुक्त अजित मुठे यांना तेथील दोन भूमाफियांनी धक्काबुक्की करत शिवीगाळी केली. त्यामुळे अहंकार दुखावल्या गेलेल्या उपायुक्त अजित मुठे यांनी भूमाफियांची दादागिरी ठेचून काढली. मात्र हीच दादागिरी कामणमध्ये गुप्तासारखा एक भूमाफिया करत असताना त्याला ठेचण्यात उपायुक्त अजित मुठे यांना मुहूर्त सापडत नाही का? असा एक संतप्त सूर कामण परिसरात लागत आहे. 
दरम्यान, कामणमधील अनधिकृत बांधकामांची दखल घेत भूमाफियांना वालीव विभागाने नोटीसा काढल्या आहेत. मात्र या नोटीसा अद्याप भूमाफियांना देण्यात न आल्याने भूमाफियांवरचं अतिप्रेम वाढीस लागल्याचे हे लक्षण असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भूमाफिया गुप्ता याच्या कामणमधील सागपाडा-देवदळ परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी एमआरटीपी नोटीसा द्यायच्या की, नाही? याबाबत वालीव विभागावर व स्वत: उपायुक्त अजित मुठे यांच्यावर काही दबाव आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. अनधिकृत बांधकामं ही पालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक वसुलीचे केंद्रस्थान ठरल्याचे आरोप मध्यंतरी झाले. उच्च न्यायालयाने पालिकेला खडे बोल सुद्धा सुनावले मात्र त्यानंतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास पालिकेला नैतिकदृष्ट्या जाग आलेली नाही. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वालीव विभागाने भूमाफियास एमआरटीपी नोटीस काढल्या आहेत. मात्र या नोटीसा अद्याप भूमाफियांना दिल्या नसल्याने नागरिकांत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास पालिकेला अद्याप जाग आलेली नाही. अनेक दिवसांपासून सदर अनधिकृत बांधकामांना काढलेल्या नोटीसाच धुळखात पडल्या असल्याने पालिकेला धोकादायक अनधिकृत बांधकामांवर कारवाया करण्यासाठी किती तळमळ आहे, त्याचे चित्र दिसून येते. पालिकेला कारवाईसाठी जर मुहूर्ताची वाट पाहावी लागत असेल तर सदर अनधिकृत बांधकामात वालीव विभागाचे आर्थिक हितसंबंध दडले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
आधीच पालिकेने पालिका हद्दीत दरड कोसळण्याचा धोका असल्याचे वर्तवला आहे. नागरिकांना घरेही खाली करण्यास सांगितले आहे. असे असताना दरडप्रवण क्षेत्रातच अनधिकृत बांधकामं होत असताना पालिका शांत का असा सवाल वसई संस्कृती करत आहे. दरम्यान, वालीव विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ कटेवर हात न ठेवता अनधिकृत बांधकामावर ज्या रितीने कारवाईच्या नोटीसा धुळखात ठेवल्या आहेत, त्यावरून सदर अनधिकृत बांधकामावर वालीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रती किती संवेदना आहे, ते दिसते. पालिकेने या अनधिकृत बांधकामांचे लाड न करता कारवाई केली पाहिजे. तरंच गुप्ता नामक मस्तवाल भुमाफिया लायकित राहील व पालिकेच्या महसुलावर डल्लाही मारला जाणार नाही. दरम्यान, कामण परिसरातील सागपाडा-देवदळ येथील अनधिकृत बांधकामं नेस्तनाबुत करण्यास पालिकेला जाग येणार नसेल, तर पालिका प्रशासनातील प्रशासकीय राजवट ही मोठी डोकेदुखी आहे, असे म्हणण्यास जागा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *