
75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामन मध्ये घडलं हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्शन
जमाते मुस्लिम कामंन संघटनेचा सक्रिय सहभाग
कामन मधील भजनी मंडळ ,महिला बचत गट यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग
कामन मधील प्रतीत यश उद्योजक हजरत शेख हे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा व एकोपा राखण्यास प्रयत्नशील असतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभर विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहेत. कामनमध्ये हजरत शेख यांच्या संकल्पनेतून तीनशे फूट झेंडा मिरवणुकीचा कार्यक्रम यशस्वी व मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मिरवणुकीत प्रथमच मुस्लिम महिलांनी मोठ्याने सहभाग
घेत ल्याचे पाहायला मिळाले. जमाते मुस्लिमिन कामन या संस्थेने देखील 300 फूट झेंडा मिरवणुकी मध्ये मोलाचे सहकार्य व सहभाग घेतला होता. त्याला का मन मधील भजनी मंडळ व महिला बचत गट यांनी देखील मोलाचे सहकार्य केले .सर्व जाती-धर्माचे व पंचक्रोशीतील सर्व नागरिक या तीनशे फूट झेंडा मिरवणुकी मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते, 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9वाजता हजारो महिला सर्व राजकीय पक्ष, पक्षांमधील पदाधिकारी ,कार्यकर्ते सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुष विशेषता प्रथमच मुस्लिम समाजातील महिला यांनी मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांनी देखील या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला होता .वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यात अशा प्रकारची ऐतिहासिक मिरवणूक खचितच बघायला मिळाली .अत्यंत कमी वेळात व नियोजनबद्ध पद्धतीने कमंन मधील उद्योजक मॅनेजमेंट गुरु हजरत शेख व त्यांचे व्यवसायिक भागीदार संजय म्हात्रे यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते व त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला .या मिरवणुकीमुळे कामन मध्ये हिंदू मुस्लिम व अन्य धर्मियांमध्ये मध्ये सामाजिक एकोपा असल्याचे पुन्हा निदर्शनात आले .सर्वधर्मसमभाव, धार्मिक शांतता, सलोखा, यासाठी हजरत शेख नेहमीच प्रयत्नशील असतात, याचा तीनशे फूट तिरंग्याच्या मिरवणुकी दरम्यान पुन्हा एकदा कामंन वासियांना अनुभवास मिळाला .ही मिरवणूक सकाळी नऊ वाजता आयेशा कंपाउंड येथून निघाली व संपूर्ण गावात दोन तास फिरून तिची सांगता पुन्हा आयशा कंपाऊंड येथे करण्यात आली
यंदा प्रथमच कामन मधील हरजत शेक यांच्या घरातील मुस्लिम महिलांनी झेंडा वितरणामध्ये व झेंडा मिरवणुकी मध्ये मोठ्या हिरीरीने पुढाकार घेतला ,त्यांच्या पत्नी, वहिनी, बहिणी, इतर गावातील तरुण यांनी पंचक्रोशीत प्रत्येक घराघरात जाऊन तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप केले. झेंड्याची आचारसंहिता, झेंडा कसा लावावा, झेंड्याचे पावित्र्य कसे राखावे, याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
हजरत शेख यांनी कामंन व आजूबाजूच्या पंचक्रोशीत जवळजवळ 4000 झेंड्यांचे वितरण मोफत केले, अडीच हजार झेंडे रिबिन व इतर साहित्य हे रत्नागिरी मालवण जयगड रायगड कोकण या ठिकाणी देखील त्यांनी पाठवून दिले असल्याचे समजते . या तीनशे फुट तिरंगा मिरवणुकी प्रसंगी त्यांना कामन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील कार्याध्यक्ष शाहिद अन्सारी ,तथा कामन मास्टर एकता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय म्हात्रे कार्याध्यक्ष अशोक भोईर, तसेच जमाती मुस्लिमिन कामन, नीती धर्म जागृती मंडळ कामन, मैत्री ग्रुप कामन, श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ कामन, कामं न चा राजा गणेश मंडळ, संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ कामन, चींचोटी, कॉमन नागले रिक्षा चालक-मालक संघटना ,संकल्प ग्रुप कामन, सारनाथ नगर मित्र मंडळ कामन संकल्प महिला मंडळ ,बचत गट राम रहीम महिला मंडळ,श्री गणेश महिला बचत गट कामंन अशा विविध सामाजिक संघटना महिला, बचत गट, भजनी मंडळ यांनी 300 फूट तिरंगा मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता व कार्यक्रम यशस्वी व मोठ्या उत्साहात संपन्न केला .
आपल्या नियोजन बद्ध पद्धतीने कार्यक्रम नेहमीच यशस्वी करण्यात हातखंडा असलेले कामंन मधील प्रतीत यश उद्योजक व मॅनेजमेंट गुरु हजरत शेख यांनी कमी वेळात संपूर्ण झेंड्याची व्यवस्था करून कार्यक्रम सर्वांच्या सहकार्य यशस्वी केला विशेषता मुस्लिम महिलांनी झेंड्यावरील अशोक चक्र हस्तकलेणे बनवला असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला कामन मधील तीनशे फूट तिरंगा मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम महिलांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता तसेच पाच वर्षे ते 75 वर्षे वयोगटातील सर्व महिला पुरुष यांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला याचा आपल्याला अभिमान असल्याचे हजरत यांनी शेवटी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याचबरोबर अशाच प्रकारे कामंन व पंचक्रोशातील सर्वधर्मसमभाव व सामाजिक एकोपा ,सलोखा अबा तीत राहील याची याप्रसंगी त्यांनी ग्वाही दिली