
वसई ( प्रतिनिधी) दैनिक आपला उपनगर चे कार्यकारी संपादक डॉ अरुण घायवट तसेच भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्ह्याचे पर्यटन सचिव चरण घायवट ह्यांच्या मातोश्री जानकी रामचंद्र घायवट ह्यांचे काल बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता वृद्धपकाळाने त्यांचा मृत्यू झाला आहे. सांयकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर वसई पाचूबंदर येथील समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ही मातोश्री प्रेमळ आणि कुटूंब वत्सल तसेच सिद्धार्थ नगर मधील सर्वात वयोवृद्ध माता होती. काल त्यांच्या निधनाची वार्ता कळताच ग्रामस्थ, सगेसोयरे, मित्र मंडळींनी अंत्यसंस्कारासाठी मोठ्या जण समुदायाने उपस्थिती लावली. डॉ अरुण घायवट आणि चरण घायवट ह्याचे समाजातील मानाचे स्थान बघता मोठा जनसमुदाय त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले तसेच 4 मुली रेखा रमेश गायकवाड, नंदा प्रभाकर जाधव, प्रेमा अंकुश शेष, सुशीला घायवट, सुना चित्रा, अनिता तसेच नातवंड असा भरलेला परिवार आहे. गावातील सर्वात जेष्ठ आणि प्रेमळ मातोश्रीच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला असून त्यांचा पुण्यानुमोदन ( 12 वे) रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.