आस्मानी संकट महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात कोसळले. त्यासाठी संवेदनशील जनतेला काहीतरी मदत स्वत: तर्फे गरजु पर्यंत पोहचवण्याची ईच्छा आहे पण मार्ग नाही अशी परिस्थिती आहे.
*कोल्हापूर_सांगली_चिपळूण व सातारा जिल्ह्यातील* पाणी जसे ओसरु लागेल तसे पूरग्रस्त आपापल्या घरी परततील. तेव्हा त्यांच्या समोर प्रश्न असेल अन्न, वस्त्र व निवाऱ्याचा आणी त्यानंतर पसरण्याऱ्या रोगराईचा. त्यासाठी काॅटनकिंग समुह काही प्रकल्प हाती घेत आहे. त्यातील गरजु पर्यंत लोकसहभागातुन अन्न/शिधा पोचवण्यासाठीच्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपणांस आवाहन करत आहोत.
इच्छुकांनी कोरडा शिधा चार/पाच माणसांच्या कुटुंबाला चार दिवस पुरेल असा पिशवीत गोळा करावा. ज्यात तिखट, मिठाच्या वा मसाल्याच्या कागदी पुड्या पासुन कणिक वा ज्वारीचे पिठ, तांदुळ, डाळ, सीलबंद अर्धा लिटर तेलाची बाटली असा समावेश असावा. जेणे करुन एका कुटुंबाला एक शिधा पिशवी दिली तर त्या कुटुंबाची चार दिवसाची गरज पुर्ण होईल. त्यामधे टुथपेस्ट, साबण अश्या वस्तुंचा पण समावेश करता येईल. पण कुठलाही ओला वा नाशिवंत पदार्थ जसे की भाजी, फळे पिशवित नसावी. अश्या बंद केलेल्या पिशव्या आपण नजिकच्या काॅटनकिंग स्टोरमध्ये उद्या रविवार दिनांक ११ तारखे पर्यंत पोच कराव्यात. आम्ही आमच्या वाहनांनी त्या सोमवारी गरजु पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करु.
आपण हा मेसेज आपल्या इच्छुक मित्र व परिवारासह सर्वांना पुढे पाठवून लोकसहभाग वाढवण्यास मदत करु शकता.
तरी लक्षात ठेवा आपली मदत उद्या रविवार पर्यंतच पोहोचवा. त्यानंतर दिलेल्या मदतीचे वितरण होवु शकणार नाही. तरी वेळेत मदत पोहोचवण्याची विनंती.

नालासोपारा – वसई – विरार मधील जनतेला जर मदत करायची असेल तर खालील पत्त्यावरत आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019 पर्यंत आणून द्यावे.

Mobile_Number – +918983448487 / +917972937395

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *