
वसई युवा बल संघटना आणि वसई विरार शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टी यांच्या अथक प्रयत्नाने आणि व्हॅलेंटाईन मिरची यांचा सततचा भरमसाठ पत्रव्यवहार आणि पाठपुरावा, विरारच्या महापालिका मुख्य कार्यालयात सततच्या हेलपाट्या, महापालिका कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा दिलेला लेखी ईशारा आणि माननीय खासदार राजेंद्र गावित यानी दिलेले महानगरपालिकेला तातडीचे आदेश, या सगळ्या प्रयत्नामुळे अखेर वसई किल्लाबंदर येथील ” जॉनी ईवा ते वसई सागरी कोळी ” ( पहिला टप्पा सेंट पीटर शाळेपर्यंत ) या डाम्बरी रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर अर्थात या रसत्याचे कामाचे आदेश देण्यात आले आहेत !सदर रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे !
हा रस्ता निवडणुकी आधी होऊ नये म्हणून या सदर रस्त्याच्या कामात सत्ताधाऱ्यांनी अनेकवेळा अडथळे आणून पालिका प्रशासनावर दबाव आणून ठेवला होता. अशा परिस्थतीत माजी नगरसेवक व्हॅलेंटाईन मिरची यांनी महापालिका प्रभाग ” आय ” चे ज्युनिअर अभियंता अनिकेत मोहिते यांना घेऊन स्वता या रस्त्याच्या फाईलवर अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या !
या रस्त्याची वर्क ऑर्डर ( कामाचे आदेश ) व्हावी आणि या रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून महानगरलिकेच्या कार्यालयात मिरची याना इतक्या फेऱ्या माराव्या लागल्या की , अखेर मिरची यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचे लेखी पत्र दिले, तेव्हा विरार पोलीस स्टेशन मध्ये आणि पालिका मुख्य कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. सदर बाब ही खासदार राजेंद्र गावित यांच्या लक्षात आली तेव्हा , अखेर पालघर जिल्हा खासदार राजेंद्र गावित यानी स्वता त्यांचे P A संजय वाघमारेला विरारच्या मुख्य कार्यालयात मिरची यांच्यासोबत पाठवून शहर अभियंता एम जी गिरगावकर यांच्याकडून या डाम्बरी रस्त्याची वर्क ऑर्डर करून घेतली.
या सदर रस्त्यासाठी वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस चे ओनिल आलमेडा यांनीही पालिका अधिका ऱ्यांच्या सारखे संपर्कात राहून विशेष मेहनत घेतली !
सुमारे ४२ लाख रुपये खर्च असलेला सदर रस्ता हा दोन टप्प्यात होणार पहिला टप्पा किल्लाबंदर येथील श्री जॉनी इवा ते पाचूबंदर येथील सेंट पीटर शाळेपर्यंत आणि दुसरा टप्पा सेंट पीटर शाळा ते पुढे वसई सागरी कोळी संस्था असा दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
या रस्त्यासाठी सत्ताधाऱ्यानी पालिका प्रशासनावर कितीही दबाव आणला कितीही हा रस्ता दाबून ठेवला असला तरी आपण आपली इच्छाशक्ती, आपला उत्कृष्ट आणि रोखठोक पत्रव्यवहार आणि आपल्या वसई युवा बल च्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण कोणालाही आणि कुठल्याही सत्ताधारी शक्तीला जुमानणार नाही ! अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी नगरसेवक व्हॅलेंटाईन मिरची यांनी व्यक्त केली आहे.
- व्हॅलेंटाईन मिरची, उपाध्यक्ष, वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक



