
दि. 21: कोरोनाच्या महामारीच्या काळात विशिष्ट प्रकारच्या कीडीच्या प्रादुर्भावामुळे वसईतील खोचिवडे कोळीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या विशिष्ट कीडीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत त्वरित योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी प्रशासनाकडे केली आहे.
लाखोंच्या संख्येने या कीडीने समुद्री वनस्पती समजल्या जाणार्या टिवराच्या झाडांवर आक्रमण करून टिवरांची झाडं
खाल्ली आहेत. त्यामुळे टिवरांची झाडे नष्ट होण्याच्या धोका वर्तवित या कीडीचा चालण्याचा वेग प्रचंड असल्याने अगदी दोन तीन दिवसातच खोचिवडे किनार्यावरील घरांवर या कीडीने शिरकाव केला आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या कीडीमुळे रोगराई पसरू नये
भविष्यात नागरिकांना ञास होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने
त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी केली आहे