
‘
मुंबई : कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मंडळाच्या शनिवार दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल) सेंट झेवीयर स्ट्रीट परळ मुंबई – १२ येथे झालेल्या बैठकीत कुणबी युवा मंडळ मुंबई अंतर्गत कुणबी युवा ब्रिगेडची कार्यकारिणी जाहीर झाली असून या महत्वपूर्ण विंगच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी शाखा महाड-पोलादपूर चे डॅशिंग, सर्वसमावेशक युवा नेतृत्व योगेश कुणबी युवा मुंबई अंतर्गत मालप यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सदर युवा ब्रिगेडच्या उपप्रमुखपदी सिद्धेश गोरुले (लांजा रत्नागिरी), ज्ञानेश्वर शिगवण (तळा- रायगड) तसेच सेक्रेटरी ? किरण बाईत (मंडणगड), खजिनदार सुमित धोंडगे (महाड) तसेच सल्लागार ? म्हणून विशाल रामाणे व भास्कर कारे यांची सर्वानुमते निवड करण्यात
आली आहे. या सभेत संपर्कप्रमुख नितीन बारस्कर व अक्षय बैकर तसेच प्रचारक म्हणून मयुर डावरूंग व गजानन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून ‘युवा जोडो
अभियान ?’ राबवत कुणबी युवा जोडण्याचे महत्वाची कामगिरी या युवा कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.