

कुणाकुणाला श्रध्दांजली वाहू !
कुणाकुणाला सात्वना देवू !!
हात जोडतो देवा तुझ्या समोर !
आता नको आमचा अंत पाहू !!
रोज एक अनामिक भिती !
आज कोणाचा नंबर येईल !!
कोणाची आई कोणाचे वडील !
न जाने कोणाचा जीव जाईल !!
देवा कुणाचं पाप तू !
आमच्या माथी टाकलं !!
ह्या कोरोणाच्या साथीन !
माणूसकीलाही मारलं !!
एकच आर्जव करतो देवा !
उगार तुझे अजस्त्र बाहू !!
नायनाट कर ह्या महामारीचा !
मग आम्ही कोरोणालाच श्रध्दांजली वाहू !!
