डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा.ता. अलिबाग जिल्हा. रायगड. अध्यक्ष. पद्मश्री आदरणीय . तीर्थरूप डॉ.श्री. दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी.यांच्या मार्गदर्श नाने व आदरणीय तीर्थरूप श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने केळवे बीच येथे 2 एकर परिसरात सुरुची २५००. वृक्ष लागवड व संवर्धन सुमारे 3000 सदस्यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान. हे एक सामाजिक सेवाभावी प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानची सुरुवात 1943 मध्ये अध्यात्मिक कार्य पासून सुरू झाली आहे. बालसंस्कार मार्गदर्शन व स्त्री-पुरुष अध्यात्मिक समाजप्रबोधन सोबत सामाजिक व पर्यावरण संतुलन बनवण्या हेतू जनजागृती करण्याचं महत्त्वपूर्ण योगदान प्रतिष्ठान देत आले आहे.
या प्रतिष्ठानद्वारे समाज प्रबोधनाच्या उत्तम विचारांच्या माध्यमातून वृक्षारोपण वृक्षसंवर्धन अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य शिबिर प्रौढ साक्षरता व्यसन निर्मुलन समाजातील घटकांवर मार्गदर्शन आणि मदत कार्य बस स्टॉप सेवा पाणपोई व्यवस्था, स्वच्छता अभियान, विहीर स्वच्छता अभियान, स्मशानभूमी क कब्रस्थान स्वच्छता, जलपुनर्भरण अभियान ,मोफत जेष्ठ नागरिक व वय व अधिवास दाखले वाटप अशा अनेक उपक्रमांतून समाज सेवा चे कार्य देशभरात अखंड चालू आहे.
मनुष्य ही एकच जात व मानवता हा धर्म ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना समाजात रुजवण्याचे काम प्रतिष्ठान करते. प्रतिष्ठानचे कार्य बघून महाराष्ट्र शासनामार्फत 2008 मध्ये आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब तथा (नारायण) विष्णू धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय तीर्थरुप आप्पासाहेब तथा (दत्तात्रेय) धर्माधिकारी यांना केंद्र शासनाद्वारे 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छता दूत म्हणून संबोधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *