

दि. २ सप्टेंबर,
गणेशशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी एक भरधाव वेगाने आलेली गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलनाक्यावरील जून्या पुलाच्या रस्त्यावर आदळली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरीही पुलनाक्या सारख्या संध्याकाळ च्या वेळी गजबजाट व रहदारी असणाऱ्या ठिकाणी इतक्या वेगाने फाँर्चूनर गाडी चालवणार्या चालका बद्दल संताप व्यक्त होत आहे. हा अपघात होत असताना एस टी बस ची वाट बघत स्टाँपवर उभे असलेले प्रवासी थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले आहे. दरम्यान ह्या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देण्याचे सुद्धा टाळले असून ही गाडी एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याची असल्याने पोलीसांनी टाळाटाळ केली असल्याची चर्चा नागरिकांमधे होत असून पोलीस प्रशासना विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्यानंतर लगेचच गाडीची नंबार प्लेट काढून टाकूनओळख लपवण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रकाराबद्दल पोलीसांनी केलेली टाळाटाळ बघता पोलीस प्रशासन हे फक्त सामान्य दुचाकीस्वारांना अडवून कारवाई करण्यात धन्यता मानत असताना सदर अपघाताबद्दल बाळगलेली उदासिनता बघता कायदा फक्त सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी वापरण्यात येत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत