

केळवे येथे तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या नूतन विद्या विकास मंडळ संचलित अपूर्वा, अलका जयेश चौधरी प्राथमिक विद्यालय, केळवे आयोजित रोटरी क्लब ऑफ पालघर व इंटरेक्ट क्लब आदर्श विद्या मंदिर, केळवे पुरस्कृत तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा शनिवार दि. 04.01.2020 रोजी आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. जितेंद्र भालचंद्र राऊत , अध्यक्ष नूतन विद्या विकास मंडळ, केळवे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ पालघर चे अध्यक्ष मा.श्री.अमित रमाकांत पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी कु. कृतिका नंदन वर्तक, राज्यस्तरीय जलतरणपटू, विरार यांनी क्रीडा स्पर्धांचे उदघाटन केले. लहान वयातच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन पुढे जाऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती होण्यासाठी संस्थेने एक चांगला उपक्रम राबविला. या क्रीडा स्पर्धेत सांघिक मध्ये लंगडी, कबड्डी असे तसेच वैयक्तिक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. क्रीडा स्पर्धेत पालघर तालुक्यातील तारापूर, मनोर, पालघर, माहीम , केलवेरोड परिसरातील बऱ्याच शाळा सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित लावली. विद्यार्थ्यांना अल्पोपहार साठी नूतन विद्या विकास मंडळ, केळवे व श्री. भूषण सावे यांनी आर्थिक सहकार्य केले. विविध क्रीडा स्पर्धा मध्ये मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पारितोषिके पटकवली. सर्वाधिक पारितोषिके अपूर्वा, अलका जयेश चौधरी प्राथमिक शाळा केळवे येथील मुलांनी पटकवली. मुलां ना मार्गदर्शन करण्यासाठी केळवे गावातील लोकांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नूतन विद्या विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपले बहुमोल योगदान दिले.
