गेली ७० वर्षे कोंकणवर सातत्याने होणार्या अन्यायाचा विरोधात आज कोंकणवासीयांचा विराट मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
कोंकणचा समृद्ध प्रदेश,पर्यटन व्यवसायास पोषक वातावरण असुन सुद्धा शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका कोंकणवासीयांना बसतोय.
पर्यटन,मत्स्य,आंबा, काजू,कृषी व इतर पुरक उद्योगांच्या विकासासाठी निधी,प्रोत्साहनपर योजना आणि कोंकणातील तरुणांना कोंकणात नोकर्या सारख्या मागण्या घेऊन कोंकणचा भुमिपुत्र एकवटला.
आज दि.२०/०६/२०१९ रोजी कोंकण रोजगार अभियानाचे अध्यक्ष संजय यादवराव,
राजीव पाटील, कार्याध्यक्ष ग्लोबल कोंकण तसेच प्रथम महापौर वसई विरार महानगरपालिका,आशिष पाटील- अध्यक्ष,केळवे बीच पर्यटन, देवराम पाटील- जिल्हा परिषद सदस्य अर्नाळा, महादेव निजाई- अध्यक्ष अर्नाळा हाॅटेल असोसिएशन,
विनोद पाटील माजी सरपंच केळवे,हाॅटेल असोसिएशन केळवेचे सदस्य आणि स्थानिक भुमिपुत्र यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी पालघर यांना प्रातिनिधिक मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनातील काही प्रमुख मागण्या.
१) शासकीय नोकरीत कोकणाला ८०% प्राधान्य व कोकण निवड मंडळ निर्मिती.
२)स्वतंत्र कोकण व्यवसाय शिक्षण विद्यापीठ निर्मिती.
३)स्वतंत्र कोकण पर्यटन विकास प्राधिकरण निर्मिती व सर्वांगीण विकासाचे अधिकार
४)२०१९ पर्यतची कोंकणातील सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करावीत.
५)पर्यटन,कृषी,मत्स्य,प्रक्रिया इ.उद्योगांना सवलती,सबसीडी,सुलभ कर्ज पुरवठा.
६)कोंकणातील प्रत्येक तालुक्यांत फळप्रक्रिया कारखान्यांची उभारणी.
७)प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यबीज निर्मिती हॅचरी,नर्सरी व कोकणात मत्स्य विद्यापीठ.
८)आंबा,काजू,कोंकण इ.फलोत्पादने व कृषी मालास हमीभाव.
९)हापूस बॅन्डची निर्मिती व हापूसला बाजारपेठ.
१०) सह्याद्री फाऊंडेशन निर्मिती व सह्याद्रीतील शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *