
नवी मुंबई दि.15 :- कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे आज वंजारवाडी ता. तासगाव, जि.सांगली या त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराने दु:खद निधन झाले.
श्री.दौंड यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना, सचिव राज्य माहिती आयोग, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, लघूउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशा विविध पदावर काम केले होते.
या शिवाय कोरोना काळात त्यांनी कोकण विभागासाठी विशेष कार्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी शासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रशासकीय कामात त्यांची चांगली पकड होती. लोकसंग्रहही अधिक होता.