
विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच अनेक पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी यांनी प्रचाराच्या कार्यक्रमाला सुरवात केलेली आहे. त्याचअनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशोर जैन यांच्या प्रचाराकरिता आज शिव विधी व न्याय सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ऍड. नितेश सोनावणे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य चिटणीस ऍड. ज्ञानेश्वर कवळे यांनी वसईतील शिवसेनेच्या वकील संघटनेच्या पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेवून प्रचाराला सुरवात केली.सदर भेटीत त्यांनी विधानपरिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व पदवीधर मतदार यादीतील वकिलांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे असे पदाधिकारी यांना आवाहन केले. यावेळी उपस्थित शिव विधी व न्याय सेनेचे पालघर जिल्हा मुख्य समन्वयक ऍड. भरत पाटील, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य ऍड. गिरीश दिवाणजी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. आनंद घरत, जिल्हा सरचिटणीस ऍड. कुणाल कोदे, वसई शहराध्यक्ष ऍड.साबिया काझी, ऍड. विरार शहराध्यक्ष पूनम पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार किशोर जैन यांचाच विजय होईल असे मत सदर भेटीवेळी अनेक वकीलांनी व्यक्त केले.