दिनांक:- 24/01/2021 रोजी सायंकाळी 4 वाजता पापडी हुतात्मा गार्डन येथे मैत्री संस्था , सद् -भावना संघ, लेक लाडकी अभियान तर्फे ” सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा – 2021, वर्ष 10 वे याचे उदघाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला, मा.भाऊ जगताप यांचे वसई विरार शहरात मा.फिरोज खान यांनी हार घालून स्वागत केले ,सदरच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक: मा. भाऊ जगताप, कामगार नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश प्रतिनिधी, विशेष अतिथी: मा.एड.पी.एम.व्यास, जेष्ठ कायदेतज्ञ- उच्च न्यायालय, मुंबई ,समारंभ अध्यक्ष: मा.गंगाधर म्हात्रे, आदिवासी सेवक, विशेष उपस्थिती: मा.प्रजोत मोरे, अध्यक्ष: बोध्दीसत्व प्रतिष्ठान, मा.कुंदन रोशन, फिल्म डायरेक्टर, मा.श्रध्दा मोरे, बोर्ड सदस्य , लायन्स क्लब, मा.सुरज भोईर, अध्यक्ष: मैत्री संस्था, मा.फिरोज खान, अध्यक्ष: मैत्री संस्था पालघर, मा.उमेश जामसंडेकर, एस. सी.टी. वि. मराठी संपादक, मा. मेघा म्हात्रे , राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा अध्यक्षा, मा. जयश्रीमाई सावर्डेकर, समाज सेविका या सर्व मंचावर उपस्थित होते, सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,
मैत्री संस्था,सद्भावना संघ,लेक लाडकी अभियान अंतर्गत सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आणि कार्यकर्ता समेलं आयोजन स्थळ हुतात्मा गार्डन,पापडी, वसई येथे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे कामगार नेते भाऊ जगताप,ज्येष्ठ विधीज्ञ पी.एम.व्यास,सामाजिक – राजकीय कार्यकर्त्या मेधाताई म्हात्रे,श्रद्धा ताई मोरे, मुन्नाभाई, प्रज्योत मोरे,पत्रकार जामसंडेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी हुतात्मा स्तंभाला(ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना) पुष्पगुच्छ देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कामगार नेते भाऊ जगताप यांना संविधान सरनामा मानपत्र प्रदान करण्यात आले आणि मानाचा फेटा घालून स्नमा न करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्य कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला.मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक चढ उताराचे प्रसंग आले.कठीण प्रसंग आले पण मी माझ्या कार्यक्षेत्रात काम करीत राहिलो.ह्या कार्यक्रमास भाऊ जगताप,आणि जेष्ठ विधीज्ञ पी.एम.व्यास साहेब उपस्थित राहून आमच्या कार्यशाळेस आशीर्वाद दिलेला आहे.तसेच हिंदी लघु चित्रपट “मा”,”आई” ह्याचे उद्घाटन भाऊ जगताप यांच्या हस्ते झाले. हा चित्रपट समाज माध्यमातून (यू ट्यूब चॅनल) प्रसारीत होणार आहेत.
बोधीसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रजोत मोरे यांनी सूरज भोईर यांचे प्रशंसोदगार काढताना गेली १० वर्षे सातत्याने कोणतीही अपेक्षा नसताना सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कसोशीने करत आहे.,तर श्रद्धा. मोरे यांनी सांगितले की,सामाजिक स्तरावर उपयुक्त असे सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग याचा फायदा प्रत्यकाने घेतला पाहिजे.
मेधाताई म्हात्रे यांनी बालिका दिनाच्या निमित्ताने सर्वाँना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उपक्रमात नेहमीच सूरज भोईर सरांचे सहकार्य मिळाले आहे. मुन्नाभाई यांनी सोशल वर्क (सामाजिक कार्य) ला सर्वप्रथम घरातूनच विरोध मिळत असतो.परंतु विरोध पत्करून सुध्हा सच्चा समाजसेवक हा समाजात काम करीत असतो,आणि त्याला सामाजिक कार्याचा अनुभव स्वर्गीय आनंदाचा क्षण वाटतो.सामाजिक काम हे फक्त कार्यकर्त्यांचे काम नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.तर पत्रकार उन्मेष जामसंडेकर यांनी कार्यशाळेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर भाऊ जगताप,व्यास साहेब याचे कार्य शैलीतील अनुभव आणि सूरज भोईर सर यांना सहकार्य करावेत तर तुम्ही चांगले प्रशिक्षण घेऊन क्रियाशील व्हाल अशी ग्वाही दिली.तर आदिवसी मित्र गंगाधर म्हात्रे यांनी आदिवासींच्या न्याय हककांसाठी केलेले आंदोलन आणि त्यातून आलेली निराशा मय घटना आपल्या भाषणातून व्यक्त केली.आणि न्याय सुध्हा उशिरा मिळत आहे अशी खंत व्यक्त केली.
पी.एम.व्यास सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ता हा समाजातील फार महत्वाची भूमिका बजावत असतो,आणि ही व्यक्ती फार महत्वाची असते.ही व्यक्ती समाज,राज्य,देश यांची सेवाच करीत असते.आणि समर्पित वृत्तीने केलेली मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे.असे त्यांनी नमूद केले.
तर,आपल्या भाषणातून भाऊ जगताप यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन होणे व समाजाच्या प्रती आपुलकी,प्रेम असणारे सूरज भोईर सारखी मंडळी कार्यरत आहेत.आणि ही मंडळी निस्वार्थी वृत्तीने काम करताहेत.असे गौरवडगार त्यांनी काढले.तसेच कोणत्याही व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा कोणतेच पद मोठें नसते.सामाजिक कार्यकर्त्याने पद हे युनिव्हर्सिटी हून विद्यार्थ्याला मिळणाऱ्या पद्वीपेक्षाही मोठें पद आहेत सामाजिक कार्यकर्ता घडविणे आणि त्यातून समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी निस्वार्थी वृतीनेकाम करतो म्हणूनच हे पद फार मोठे पद आहेत. ह्या ठिकाणी सूरज भोईर यांच्या बरोबर त्यांच्या समवेत असणारे फिरोज खान,शमीम खान,रेजिन डिसोझा, अस्लम आदी कार्यकर्ते यांच्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तर सामाजिक कार्यकर्ते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सुध्हा त्यांचे महत्व आपल्या भाषणात विषद केले.तसेच त्यांनी उपस्थितांना प्रशिक्षण घेण्याचे विनम्र आवाहन केले. आणि कार्यक्रम उत्तम पद्धतीने संपन्न झाला,सूरज भोईर सरांनी सर्व कार्यकर्ते,उपस्थित मंडळीचे आभार व्यक्त केले.तसेच दि. ३१/०१/२१ रोजी रविवार सकाळी ९.०० वाजता विद्या विहार कॉलेज,विराट नगर(स्नेहा नगर),भाजी गल्ली,विरार (प.) ह्या ठिकाणी कार्यशाळेचे पहिले सत्र सुरू होणार आहे तरी विद्यार्थी,कर्मचारी,गृहिणी,जेष्ठ,प्रतिष्ठित नागरिक यांनी ह्या कार्यशाळेत सहभागी व्हावेत व आपली नोंदणी करावी अधिक माहितीसाठी 9969686014 सूरज भोईर व 8087905941सुभाष जाधव सर ह्या ठिकाणी सम्पर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मैत्री संस्थेचे काम हे पारदर्शक आहे, मा.सुरज भोईर तर असे कार्यक्रम मुंबईत ही करत राहतो, अशा सामाजिक कार्यक्रम साठी कोणतीही माजी गरज लागली फक्त मला फोन करा मी तुमचे मैत्री संस्थेचे काम त्वरित करून देईन, मा.सुरज भोईर यांनी सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा बाबत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन हे कार्यशाळा यशस्वी करावी या कार्यशाळेचे पुढील शिबीर विरार येथे होणार असल्याचे कळविले आहे, सदरच्या कार्यक्रमात येणाऱ्या मैत्री संस्थेच्या के कार्यकर्त्यांना प्रजासत्ताक भारत – आदर्श कार्यकर्ता सम्मान -2021 देऊन गौरविण्यात आले, सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.आसिफ शेख, युवा अध्यक्ष, मा.ऍड.सबा शेख, युवा महिला अध्यक्षा, मा.शमीम फिरोज खान, महिला जिल्हा अध्यक्षा, मा.रेजिना अलमेडा, प्रदेश प्रतिनिधी, मा. राष्ट्रपाल रनखांबे , प्रदेश प्रतिनिधी, मा.शाहिद शेख, युआ उपाध्यक्ष, मा.शालिनी डिसुझा, व.वि.महिला उपाध्यक्षा, मा. शाहिदा शेख, महिला उपाध्यक्षा, मा.मुकेश मकवना, जिल्हा सचिव, मा.अमजद शेख, वसई तालुका अध्यक्ष, मा.रिजवान शेख, वसई तालुका उपाध्यक्ष, मा.अय्याझ शेख, वसई तालुका सचिव, मा.आरती ठाकूर, व.वि.महिला सचिव, यांनी फार परिश्रम केले, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रेजिना अलमेडा यांनी केले व आभार प्रदर्शन मा.शालिनी डिसुझा यांनी केले.तसेच या कार्यक्रमात मा.कुंदन रोशन, डायरेक्टर, मा.आसिफ शेख, वसई यांची प्रोड्युस केलेली फिल्म ” आई” (माँ) या फिल्मचे मा.भाऊ जगताप यांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *