वसई : (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या जागतिक महामारीने यंदा भिषण संकट नागरी जीवनावर ओढवले आहे. सर्वच मानवी जीवन ठप्प झाल्याने यंदा याच जागतिक महामारीच्या काळात येत असलेल्या श्री गणरायांच्या उत्सवालाही काही ठिकाणी बे्रक लागणार आहे. वसईतील बर्‍याचश्या सार्वजनिक मंडळांनी यंदा मिरवणुका, किंवा उत्सवावर अफाट खर्च न करता बाप्पांचा उत्सव अगदीच साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बर्‍याचशा घरगुती बाप्पांचा उत्सवही यंदा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय भाविकांनी गेतला आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळाचा बाप्पाच्या उत्सवालादेखील फटका बसणार आहे.
यंदा 10 ते 12 फुटाच्या अशा मोठ्या मुर्त्यांची शिल्प न घडवता केवळ 6 इंचापासून पुढे 3 इंचापर्यंत मुर्त्या तयार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे जमावबंदी, संचारबंदी असल्याने कोणालाही मिरवणुका काढता येणार नाहीत. दर्शनासाठी नागरिकांना गर्दीदेखील करता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव जी मंडळी बाप्पांचा उत्सव साजरा करणार आहेत त्या मंडळांनीदेखील मखराभोवतीच कृत्रीम तलाव तयार करून त्यात बाप्पांच्या मुर्तीचे विसर्जन करणार आहेत. तसेच वसईतील सार्वजनिक मंडळांनी यंदा युट्युबवरच श्री गणरायांचे दर्शन आणि विसर्जन असे कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटामुळे गणेशमुर्ती कारखान्यांतही बाप्पांच्या मुर्त्यांसाठी काहीच बुकिंग झालेली नाही. बर्‍याचशा घरगुती बाप्पांचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतल्याने मुर्तीकारांना आर्थिक फटका बसणार आहे. वसईतील ठिकठिकाणचे सार्वजनिक गणेश मंडळेदेखील बाप्पांचा उत्सव साजरा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसेच जी मंडळे श्री गणरायांचा उत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत ती मंडळे कोणाकडेही वर्गणी मागायला न जाता मंडळाच्या सभासदांकडून व स्वखुशीने कोणी दिलेल्या वर्गणीवरच साधेपणाने हा उत्सव साजरा करणार आहेत. वर्गणीतून गोळा झालेली रक्कम ही मंडळे महापालिकेला कारोनाविरोधातील लढ्यासाठी किंवा स्तवत:चा परिसर सॅनिटायझेशन करण्यासाठी देणार आहेत. असा मानस बर्‍याच सार्वजनिक गणेश मंडळांनी व्यक्त केला आहे. यंदा बाप्पाचा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने कोठेही मिरवणुका, डीजेचा धनधनाट असे चित्र दिसून येणार नाही.

मुर्तिकार, मंडप डेकोरेटर्स व्यवसायिक अडचणित…
दरवर्षी बाप्पांच्या भव्य मुर्त्या साकारणार्‍या मुर्तिकारांना यंदा कोरोनामुळे आर्थिक फटका बसणार आहे. यंदा केवळ 6 इंच ते 3 फुट उंचीपर्यंतच बाप्पांच्या मुर्त्या तयार करून दिल्या जाणार आहेत. बरेचसे घरगुती उत्सव यावेळेला रद्द होणार असल्याने तसेच काही सार्वजनिक मंडळांनीदेखील बाप्पांचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुर्ति कारखान्यांत 10 टक्केही मुर्त्यांची बुकिंग झालेली नाही, असे मुर्तिकार सांगतात. बर्‍याचशा नागरिकांना फोन, मॅसेजेसद्वारे गणेश मुर्त्यांचे फोटो पाठवण्यात आले, मात्र कोणीही अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचे मुर्तिकार सांगतात. काही नागरिकांनी स्वत: दोन करून यंदा बाप्पांचा उत्सव साजरा करणार नसल्याचे मुर्तिकारांना सांगीतले. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुर्तिकारांना यंदा आर्थिक फटका बसणार आहे. मुर्तिकारानंतर मंडप डेकोरेटर्स व्यवसायिकदेखील संकटात आले आहेत. आधीच लग्न सीजन वाया गेल्याने आशेचा किरण असलेल्या गणेशोत्सवातील ऑर्डरही रद्द झाल्याने मंडप डेकोरेटर्स व्यवसायिकांवर आर्थिक अडचणीचे संकट कायम राहीले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा आम्ही अगदीच साधेपणाने उत्सव साजरा करणार आहोत. आम्ही 3 फुट उंचीची कागदी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. त्या मुर्तीचे नंतर मंडपाशेजारीच कृत्रीम तलाव तयार करून त्यात विसर्जन करणार आहोत. आरती करताना सोशल डिस्तनशिंगचे पालन केले जाईल. तसेच स्वखुशिने दिलेल्या वर्गण्यांवरच हा उत्सव साजरा करू. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी गेटवर सॅनिटायझरची सोय उपलब्ध ठेवली जाईल. कमी खर्चात उत्सव साजरा करण्याचा आमचा मानस आहे. शिल्लक रक्कम आणि महापालिकेला कोरोना विरोधाती लढाईसाठी मदत म्हणुन म्हणून देणार आहोत.
राजेश मातोंडकर – साईनगर गणेश मित्र मंडळ, वसई)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सव अत्यंत साधेपणाने व लोकोपयोगी कार्य करून साजरा केला जाणार आहे. शाडूची 3 फुतांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून कृत्रिम तलावाद्वारे मंडपातच विसर्जन केले जाईल. तसेच सोशल डिस्टनशिंगचे पालन करून आरती व पुजा केली जाईल. भक्तांची दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून टीसीपी इव्हेंट लाईव्ह दर्शन व विसर्जन दाखविण्यात येईल. बचत झालेल्या खर्चातून मंडळ स्वखर्चाने संपूर्ण स्टार सिटी परिसर सॅनिटायझेशन व इतर उपक्रम राबविले जाणार आहेत.
संकेश पाटील – (अध्यक्ष – स्टार सिटीचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)

– यंदा 6 इंचापासून ते 3 फुटांपर्यंत गणेशमुर्त्या सजावटीसाठी आणल्या आहेत. बुकिंगसाठी अनेकांना मोबाईलवरून फोन व मॅसेज व व्हॉटसअपवरून मर्त्यांचे फोटो पाठविले आहेत. मात्र बहुतांश लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही. तर काहिंनी ऑर्डर रद्द केल्या आहेत. आत्तापर्यंत 10 टक्केच मुर्त्यांची बुकिंग झाल्याने आर्थिक फटका बसण्याची भिती आहे. फायदा सोडा पण मजूरी निघाली तरी बस झाले.
– जयेश दत्तात्रेय पाटील (मुर्तिकार, जुचंद्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *