
वसई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत चाललेली वाढ व कोरोना विषाणूचा पहिला बळी काल मुंबईत गेला. आज राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही तब्बल 43 वर गेली आहे. देशावर ओढवलेल्या कोरोना या संसर्ग आजाराच्या संकटापासून देशाच्या तमाम जनतेला लढण्याची शक्ती मिळण्यासाठी व या आजाराचा मुळापासून नाश होण्यासाठी. बुधवार दिनांक 18 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून पक्ष कार्यालयामध्ये सायंकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत ‘विश्वकल्याण महामृत्यूंजय रुद्र यज्ञ’चे आयोजन मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या मार्फत करण्यात आले होते.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुरेश देशमुख, बाळा सावंत, श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, सुधांष चौबे, विद्याधर शेलार, रत्नाकर शेट्टी, ज्ञानेश्वर पवार, विनोद कुमार, सुरेश हेगडे, अमित दुमडा, रामानुजम, एम. जे. ईच्छापुरीया, मनोज चोटालीया, राजेश चोटालीय आदी उपस्थित होते.
