
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांचे विजेचे बिल माफ करण्यात यावे अशी मागणी बहुजन महापार्टी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उर्जामंत्री नीतीन राऊत, राज्याचे मुख्य सचिव व सचिव उर्जा विभाग महाराष्ट्र यांच्या कार्यालयात तीन महिन्याचे विजेचे बिल माफ करण्यात यावे असे विनंती अर्ज करण्यात आले होते.त्याअनुषंगाने विज पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकांचे विजेचे मीटर बिल भरले नाही म्हणून कापण्यात येऊ नयेत याबाबतचे निर्देश संबंधित अधिकारी यांना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे विजेचे बिल माफ करण्यात यावे अशी मुख्य मागणी बहुजन महापार्टी तर्फे शासनाकडे करण्यात आलेली आहे.देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 20 लाख कोटीचे पैकेज जाहीर करून विज पुरवठा विभागास 90 हजार कोटी रुपये रोख स्वरूपात देण्याची तरतूद केली परंतू अद्याप राज्यातील विज पुरवठा विभागास सदरची रक्कम मिळाली नाही सदरची रक्कम मिळताच नागरिकांचे विजेचे बिल माफ करण्यात येईल असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.केंद्र शासनाने अद्याप विज पुरवठा विभागास सदरची रक्कम दिली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे लाट पसरले आहे. केंद्र शासनाने 90 हजार कोटींचा घोटाळा केला आहे असे आरोप बहुजन महापार्टी तर्फे करण्यात आले होते परंतू अद्याप केंद्र सरकारने काहीएक रक्कम विज पुरवठा विभागाला दिलेली नसल्याने सदरची रक्कम अदानी व अंबानी यांच्या वीज वितरण कंपनीला दिली असल्याची दाट शक्यता आहे असे शमशुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आहे.