
विरार-येथील कारगिल नगर अर्धेअधिक रिकामी
प्रतिनिधी विरार : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका आता वसई-विरारकरांनीही घेतला आहेत. त्यामुळे हजारो लोकांनी गावची वाट धरली आहे. मागील दोन दिवसांत शेकडो लोक गावी गेल्याने अर्धेअधिक विरार येथील कारगिलनगरमधील रिकामे झाले आहे.
विरार-कारगिल नगर भागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बहुसंख्य कोकणवासीय राहतात. प्रचंड वर्दळ, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती, वाढता उन्हाळा आणि पाणीटंचाई अशा समस्यांना दरवर्षी तोंड देणारा हा कोकणवासीय या वेळी ‘लॉकडाउन’मुळे अधिकच मेटाकुटीस आला होता.
त्यात वसई-विरार शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या कोकणवासियांची धास्ती वाढली होती. त्यामुळे सरकारने गावी जाणाऱ्या नागरिकांना ई-पास उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक जणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार अनेकांनी खासगी वाहने, टेम्पो, रिक्षा, दुचाकी अशा मिळेल; त्या वाहनांनी गावचा रस्ता धरला आहे. कित्येकांनी तर लक्झरी बसची ग्रूप बुकिंग केलेली दिसते. यातील अनेक जण मध्यरात्रीच्या सुमारास गावी निघत असल्याने कारगिल नगरच्या रस्त्यावर रात्री लक्झरी आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होताना दिसत आहे.
दरम्यान, शनिवारी व रविवारी या आणखी भर पडलेली जाणवली.