वसई(प्रतिनिधी)- कोविड विषाणू व पावसाळी कामांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक महापौर प्रविण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली वसई येथे संपन्न झाली. या आढावा बैठकीत प्रामुख्याने कोविड रुग्णांना येणाऱ्या समस्या तसेच रुग्णांची कोविड चाचणी त्यांच्यांवरील वैद्यकीय उपचार यावर प्रामुख्याने सर्वंकष चर्चा झाली.
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव व कोरोना आजाराने मयत होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता महापौर प्रविण शेट्टी यांनी प्रशासना सोबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या आढावा बैढकीत महापौर प्रविण शेटटी, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत,आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी,महिला व बालकल्याण सभापती माया चौधरी,मनपा प्रशासनाच्या वतीने अति आयुक्त रमेश मनाले, अतिआयुक्त संजय देहरकर,उपायुक्त डॉ.किशोर गवस, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ तबस्सूम काझी तसेच प्रभाग समिती सभापती,स्थायी समिती सदस्य,महापालिका अधिकारी वर्ग,आदि उपस्थीत होते.
कोविड केअर सेंन्टर मधील वारंवार रुग्णांच्या येणाऱ्या तक्रारी,रुग्णास कोविड केअर सेंन्टर पर्यंत नेण्याकरिता उपलब्ध होत नसलेली रुग्णवाहीका,मयत रुग्णांस नेण्यासाठी शववाहीनी, कोविड केअर सेन्टर मध्ये डॉक्टरांकडून रुग्णांची नियमित तपासणी न होणे, वेळेवर नास्ता, दुपारचे व सायंकाळी अन्नपुरवठा न होणे अशा बऱ्याच तक्रारी वारंवार लोकप्रतिनिधी यांच्या कडे येत होत्या, या सर्व तक्रारी लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरुपात या अगोदरच महापालिकेचे आयुक्त यांचेकडे केल्या आहेत,परंतु त्या तक्रारींवर कारवाई न झाल्य़ाने माहापौर प्रविण शेट्टी यांनी तातडिने आढावा बैढकीचे आयोजन आज वसई प्रभाग कार्यालय येथे केले होते.नालासोपारा पूर्वेकडील दाटीवाटीने वसलेल्या चाळ एरिया मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी सुचना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी केली. कोविड विषाणू बाधीत रुग्णांचा व या आजाराने मुत्यू पावलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या नालासोपारा पूर्वेकडिल भागात असल्याने, या ठिकाणी एकत्रीत नागरिकांचा वावर, सार्वजनिक शौचालय, फळभाज्या विक्री, सोशल डिस्टसींग चे पालन न करणे अशा अनेक कारणांनी पुढे येणाऱ्या काळात कोविड रुग्णांची संख्या वाढणार आहे,याकरिता ह्या भागात विशेष लक्ष प्रशासनास द्यावे लागणार आहे, प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात याकरिता प्रशासन कारवाई करित नाही, महापालिकेला सेवा देणारे अनेक डॉक्टर नोकरी सोडून गेले आहेत. कोविड महामारी सारखा गंभीर विषय असताना महापौरांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीस आयुक्तांनी गैरहजर राहिणे,हे योग्य नाही,प्रशासनास याचे गाभिर्य नाही अशी टिका माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी केली. कोविड महामारी पासून बचाव करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून काम करण्यांची आज गरज आहे असेही माजी महापौर उमेश नाईक यांनी सांगितले. याकरिता आम्ही महासभा घेण्याची वारंवार मागणी आयुक्त कडे करीत आहोत.
नालासोपारा मध्ये दररोज ३० ते ३५ रुग्ण कोरोना बाधीत होत असताना चाळी मधील कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांच्या अधिक जोखमीच्या व रुग्णांच्या सहवासातील इतर रुग्णांना चाळीमध्ये होमक्वारंटाईन करणे कितपत योग्य आहे असा सवाल स्थायी समिती सदस्य पंकज ठाकूर यांनी केला. यावर उत्तर देताना अतिआयुक्त रमेश मनाळे यांनी आश्वासीत केले की चाळीमधील रुग्णांच्या सहवासातील नातेवाईकांना इस्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यांत यईल.व कोविड रुग्णांच्या सहवासातील नागरिकांना व त्यांच्या नातेवाईंकाना तेथील परिस्थीती पाहून योग्य त्या उपाययोजना महापालिके मार्फत करण्यांत येतील. जीजी कॉलेज आयसोलेशन सेन्टर मध्ये गरोदर महिला, मुधमेह, दमा तसेच इतर आजाराने ग्रस्त असलेले कोरोना बाधीर रुग्णांना ठेवले आहे. तेथील रुग्णांची आपल्या डॉक्टरांमार्फत तपासणी होत नाही यांची तक्रार परिहवन सभापती प्रितेश पाटील यांनी केली, ही बाब रुग्ण व लोकप्रतिनिधी वारंवार प्रशासनांस सांगत असून देखील प्रशासन लक्ष देत नाहीत.कोविड ग्रस्त रुग्णांकडून खानपानाकरिता पालिकेडून दररोज प्रति रुग्ण २०० रुपये फी आकारली जात होती, कोविड महामारित अनेकांचे रोजगार गेले आहेत, उद्योगधंदे बंद आहेत,अशा वेळी रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा द्यावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अशा वेळी मात्र महापालिका खानपाना करिता २०० रुपये आकारत असल्याने हया गोष्टीची दखल घेवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी जिवदानी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट व विवा चॅरिटेबल ट्रस्ट कडून मोफत अन्नपुरवठा केला जाईल असे घोषित केले, त्यानुसार अन्नपुरवठा सुरु देखील केला आहे. परंतु संस्थने महापालिकेला उपलब्ध करुन दिलेले नास्ता व जेवण महापालिका वेळेवर कोविड केअर सेंटर पर्यंत पोहचवून रुग्णांस उपलब्ध करुन देत नाही याची खंत सदस्य पंकज ठाकूर यांनी मांडली.
वसई येथील जि.जी.कॉलेज कोविड केअर सेन्टर मध्ये काल ता. १७ जून रोजी, रुग्णांना वेळेवर नास्ता व भोजन न मिळाल्याचा व्हिडिओ प्रसारीत झाल्यानतर प्रशासनामार्फत चौकशी केली असता, जिवदानी मंदिर ट्रस्ट कडून रुग्णांस मोफत पुरविण्यांत येणारा नास्ता व जेवण महापालिकेस वेळेवर उपलब्ध करुन देण्यांत आला होता. परंतु काही तांत्रीक अडचणी मुळे नास्ता व जेवण रुग्णांस वेळेवर उपलब्ध झाले नसल्याचे स्पष्टीकरण अतिआयुक्त रमेश मनाले याचे मार्फत कऱण्यांत आले, तथापि अति आयुक्त मनाले यांनी जीजी कॉलेज आयसोलेशन सेन्टर ला भेट देवून ह्या गोष्टीची शहानशा केली , आज नास्ता सकाळी दिलेल्या वेळत रुग्णांस मिळाला आहे. अशी माहिती आयोजित केलेल्या आढावा बैठकीत अतिआयुक्त रमेश मनाले यांनी दिली.महापालिकेने रुग्णवाहिका खरेदी केल्या असून लवकरच त्या महापालिकेच्या सेवेत दाखल होतील, तसेच शववाहिनी देखील लवकरच महापालिकेस उपलब्ध होणार असल्याची माहिती उपस्थीतांना दिली. कोविड चाचणी,रुग्णवाहिका,शववाहिनी, हॉस्पीटल मध्ये उपचार घेण्यासाठी बेडची उपलब्धता, वेटींलेटर बेड उपलब्धता, यांची सेन्ट्रलाईज माहीत उपलब्ध करण्यांत येणार असल्याचे अति आयुक्त रमेश मनाले यांनी सांगितले.
याचबरोबर पावसाळ्या अगोदर केलेल्या नालेसफाईचा देखील आढावा या बैठकीत घेण्यांत आला. प्रशासनाच्या वतीने नालेसफाई पुर्ण झाल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे. पावसाळ्या अगोदर शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील झालेले खड्डे पॅचवर्क करण्यांत येतील, असे प्रशासनामार्फत आश्वासीत केले होते, परंतु शहरातील बऱ्यांच ठिकाणी पॅचवर्कची कामे झालेली नाहीत, याची माहिती प्रशासनास दिली गेली, येत्या ३० जून अखेर शहरातील खड्डे बुजवून रस्ते पुर्वरत करण्याच्या सुचना महापौर प्रविण शेट्टी यांनी महापालिका प्रशासनास दिल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *