

मुंबई दि.29 – कोरोनाच्या जीवघेण्या संकटकाळात समाज रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी; पोलीस शिपाई ; कर्मचारी; रुग्णालयातील डॉक्टर ; नर्स;वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे असून कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शाहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
कोरोनविरुद्ध लढताना मृत्यु पावणाऱ्या कोरोनायोद्ध्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला अनुकम्पा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणी चे पत्र ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.